Published On : Fri, May 9th, 2025
By Nagpur Today Nagpur News

गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी घडविणारी मनपाची जी.एम.बनातवाला शाळा

विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध
Advertisement

नागपूर: नागपूर महापालिकेतर्फे टेका भागात इंग्रजी माध्यमाची जी.एम. बनातवाला शाळा संचालित केली जात असून प्रत्येक वर्षी दहावीच्या परीक्षेत विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकत आहे. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण यशामुळे उत्तर नागपूरमध्ये महापालिकेने सुरू केलेल्या या शाळेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांचा ओढा वाढला आहे.

नागपूर शहरात महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून गरीब, गरजू विद्यार्थ्यांना नि:शुल्क दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी मनपाद्वारे प्रयत्न करण्यात येत आहे. भविष्यातील गरज लक्षात घेऊन महापालिकेने २००९ मध्ये उत्तर नागपुरातील हबीबनगर येथे पहिली इंग्रजी माध्यमांची जी.एम.बनतवाला शाळा सुरु केली. शहरातील कोणताही विद्यार्थी चांगल्या शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार शाळेच्या इमारतीत २ माळे बांधण्यात येत असून २२ वर्ग खोल्या तयार करण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या अधिक वाढण्यास मदत झाली आहे. शाळेतील इमारतीत विद्यार्थी, शिक्षक, पालकांकरीता लिफ्ट सुविधा उपलब्ध करवून दिली जाणार आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांनाही या शाळेत कोणत्याही अडचणीशिवाय प्रवेश दिला जातो.

Gold Rate
July 23 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,900 /-
Gold 22 KT ₹ 1,35,400 /-
Silver/Kg ₹ 2,27,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सुरवातीला हबीबनगर येथील शाळेत नर्सरी ते आठव्या वर्गापर्यंत येथे वर्ग चालत असे. पुढे मनपातर्फे टेका येथे शाळेकरीता प्रशस्त इमारत बांधण्यात आली. २०१८ पासून हबीबनगर येथील शाळा टेका येथील नव्या इमारतीत हलविण्यात आले. नागपूर महापालिकेतर्फे २०१८ पासून नववी आणि दहावीपर्यंत वर्ग सुरु करण्यात आले. दहावीच्या परीक्षोत या शाळेतील विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये या शाळेत १३९८ विद्यार्थी पटावर होते.

Advertisement

गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना खासगी कोचिंग क्लासेसमधून जेईई, नीटचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. शिवाय या शाळेतील हुशार विद्यार्थ्यांची जेईई, नीट परीक्षेचे मार्गदर्शनकरीता सुपर 75 या उपक्रमामध्ये सुद्धा निवड होत असल्याने आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील, गरजू, सर्व सामान्य पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाच्या या शाळेकडे वाढला आहे. अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. आणि शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम या शाळाच्या विकासाकडे विशेष लक्ष देत आहेत.

टेका, नवीवस्ती, यशोधरानगर, पिवळीनदी, कपिलनगर, समतानगर व इतर भागातील विद्यार्थी इंग्रजी माध्यमांचे शिक्षण घेण्याकरीता जी.एम.बनातवाला शाळेला पसंती देत आहेत. नर्सरीपासून ते दहावीपर्यंत विनामूल्य प्रवेश होत असल्याने पालकांवरील आर्थिक ताण कमी झाला आहे.

रिनोवेटिव्ह फाऊंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकाग्रता, अभ्यास कसा करावा या पद्धती शिकता येत असते. शिवाय नैतिक मूल्य, तणाव मुक्तीचे धडे दिले जात असल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या वर्तणूक समस्या सोडविण्यात शाळेला बरेच यश मिळाले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकासात बराच बदल झाला आहे.

विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रयोग शिकवून त्यांना आत्मनिर्भर आणि पर्यावरण स्नेही बनविण्याचाही प्रयत्न शाळेकडून करण्यात येत असते. किचन गार्डनच्या माध्यमातून खत तयार करणे, झाडांची देखरेख आणि कृत्रिम घरटे तयार करणे इत्यादीचे प्रशिक्षण शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना दिले जाते. शिवाय शाळेतील विद्यार्थी फुटबॉल, धावणे सारख्या क्रीडा प्रकारातही घवघवीत यश मिळवू लागले आहेत. गरीब, गरजू विद्यार्थ्यांना मोफत इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मनपातर्फे मिळावे याकरीता तत्कालीन नगरसेवक असलम खान यांनी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करावी, अशी मागणी केली होती.

शाळा भरण्याची वेळ

नर्सरी, केजी 1, केजी 2 ते 4 था वर्ग सकाळी 7 ते 12पर्यंत

वर्ग 5 ते 10 वी वर्ग दुपारी 12.00 ते 5.15 पर्यंत

वर्ग आणि पटसंख्या

नर्सरी – 50

ज्युनियर केजी – 100

सिनियर केजी – 100

पहिली ते आठवा वर्ग – 1009

नववी ते दहावी- 238

शाळेमध्ये उपलब्ध मोफत-सुविधा

मोफत शैक्षणिक पाठ्यपुस्तके

मोफत गणवेश (प्रती 2), जोडे, मोजे

पोषण आहार (आठवी पर्यंत)

दूरवरुन येणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल

मोफत बस पास

दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता (प्रमाणपत्रानुसार)

मुलींसाठी प्रतीवर्ष 4 हजार रुपये आर्थिक मदत

हुशार विद्यार्थ्यांकरीता सुपर 75 योजना

दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरीता जेईई, नीट प्रशिक्षण मिळावे याकरिता नामांकित क्लासेसमध्ये मोफत प्रशिक्षण

पाचव्या वर्गापासून शासकीय शिष्यवृत्तीचा लाभ

सी.सी.टी.व्ही सुरक्षा

शाळेची वैशिष्ट्य

डीजीटल क्लास रुम

स्टीम लॅब

सायन्स लॅब

मिड डे मील योजना

9 वी 10 वी विद्यार्थ्यांकरीता ऑटोमोबाईल टेक्निशियन अभ्यासक्रम

शाळेचे प्रशस्त मैदान

किचन गार्डन

विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी क्रीडा आणि संगीत वर्ग

Advertisement
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam #news

धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...

Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी #CyberFraud #InstagramScam #Fraud #JobScam

Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...

₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV #CrimeBranch #news

₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...

पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute  #VikasThakre #PoliceAction

पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction

रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news

रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news

RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews #nagpur #nagpurnews #news

RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges