Published On : Sat, Sep 23rd, 2017

अजनी येथे इंटर मॉडेल स्टेशन उभारण्यासाठी संपूर्ण सहकार्य -देवेंद्र फडणवीस

Advertisement

नागपूर: अजनी येथे इंटर मॉडल स्टेशन तसेच खापरी येथे मल्टी मॉडल लॉजिस्टीक पार्क उभारण्याबाबत येत्या डिसेंबर पर्यंत दोन्ही प्रकल्पाचे नियोजन पूर्ण करण्याच्यादृष्टीने राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण व महाराष्ट्र मेट्रो महामंडळाने कामाला सुरुवात करावी. राज्य शासनातर्फे जमीनीसह आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण व महाराष्ट्र मेट्रो रेल्वे महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अजनी येथे इंटर मॉडल स्टेशन तसेच खापरी येथे मल्टी मॉडल लॉजिस्टीक पार्क उभारण्याबाबतचे सादरीकरण करण्यात आले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.

Gold Rate
3 May 2025
Gold 24 KT 93,800/-
Gold 22 KT 87,200/-
Silver/Kg 94,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार विकास महात्मे, आमदार सुधाकर कोहळे, प्रा.अनिल सोले, प्रा.जोगेंद्र कवाडे, प्रकाश गजभिये, मल्लिकार्जून रेड्डी, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, नासुप्रचे सभापती डॉ.दीपक म्हैसेकर, मनपा आयुक्त अश्विन मुदगल तसेच महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे ब्रिजेश दिक्षीत, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधीकरणाचे वरीष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

अजनी येथे जागतिक दर्जाचे इंटर मॉडेल स्टेशनची निर्मिती करतांना रेल्वे, मेट्रो तसेच बस यासोबतच प्रवासांसाठी आवश्यक सर्व सुविधा असलेले अत्याधुनिक मॉडेल स्टेशनची निर्मिती करतांना रेल्वे परिसरातील जागा तसेच राज्य शासनातर्फे आवश्यक जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. मॉडेल स्टेशनचे नियोजन येत्या तीन महिन्यात पूर्ण करण्यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची समन्वय समिती गठीत करण्याची सूचना करतांना इंटर मॉडेल स्टेशनचे भूमीपूजन व प्रत्यक्ष कामाला सुरुवात मार्चपर्यंत होईल यादृष्टीने नियोजन करण्याचा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अजनी येथे जागतिक दर्जाचे मॉडेल स्टेशनचे आराखडा तयार करतांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होतील. तसेच येत्या 25 वर्षाची गरज ओळखून त्यादृष्टीने वास्तूकलेतील अत्युतकृष्ट जागतिक दर्जाचे मॉडेल उभे राहील याची खबरदारी घ्या. तसेच लँड स्केपींग गार्डन तसेच वाणिज्य वापरा संदर्भात वापर याबाबत प्रामुख्याने विचार करुन देशातील सर्वोत्कृष्ठ मॉडेल स्टेशन ठरेल. अजनी मॉडेल स्टेशनसाठी 50 एकर जागेची आवश्यकता असून या प्रकल्पाच्या प्रकल्प अहवाल तयार करावा. त्यासोबत खापरी येथे मल्टी मॉडेल लॉजिस्टीक पार्कसाठी राज्य शासनातर्फे जमीन उपलब्ध करुन देण्यात येणार असल्यामुळे सर्वोत्कृष्ठ लॉजिस्टीक पार्क उभा राहील, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

Advertisement
Advertisement