Published On : Tue, Feb 24th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर मनपात महिलांना संपूर्ण नेतृत्वाची संधी; सर्व समित्यांच्या अध्यक्षपदी महिलांची नियुक्ती प्रस्तावित

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिका येथे लवकरच महिलांचे पूर्ण वर्चस्व पाहायला मिळण्याची शक्यता आहे. विविध समित्यांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने सर्व समित्यांच्या अध्यक्षपदी महिलांनाच जबाबदारी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास देशातील महिलांच्या नेतृत्वाखाली काम करणारी पहिली महानगरपालिका म्हणून नागपूरची ओळख निर्माण होऊ शकते.

भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, महिलांना राजकीय प्रक्रियेत अधिक संधी देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याबाबत घेतलेल्या भूमिकेच्या धर्तीवर नागपूर मनपातही महिलांना सर्व समित्यांचे नेतृत्व देण्याची संकल्पना पुढे आणण्यात आली.

Gold Rate
July 28 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,900 /-
Gold 22 KT ₹ 1,32,600 /-
Silver/Kg ₹ 2,18,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. सकारात्मक प्रतिसादानंतर कोअर समितीच्या बैठकीत हा निर्णय अंतिम करण्यात आल्याचे तिवारी यांनी स्पष्ट केले.
स्थायी समिती, परिवहन समिती आणि इतर दहा विशेष समित्यांच्या अध्यक्षपदासह महानगरपालिकेच्या दहा झोनच्या सभापतीपदीही महिलांचीच नियुक्ती करण्याचा प्रस्ताव आहे. प्रशासनातील निर्णय प्रक्रियेत महिलांचा अधिक सहभाग आणि प्रभाव वाढवण्याचा हा प्रयत्न असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.

विरोधी पक्षांनाही महिलांना संधी देण्याचे आवाहन-
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला स्थायी समितीतील चार जागा मिळाल्या असून त्या जागांवरही महिलांना संधी द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन आणि मुस्लिम लीग यांनीदेखील या उपक्रमात सहभागी होत महिलांना प्राधान्य द्यावे, असे तिवारी यांनी नमूद केले.

Advertisement

महिलांच्या नेतृत्वातून प्रशासन अधिक संवेदनशील, पारदर्शक आणि प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत असून या निर्णयाच्या अंमलबजावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Advertisement
BJP के बाद शिवसेना सबसे बड़ा दल : उदय सामंत #UdaySamant #ShivSena #Politics #BJP #NDA #newsupdate

BJP के बाद शिवसेना सबसे बड़ा दल : उदय सामंत #UdaySamant #ShivSena...

भूमि अधिग्रहण के खिलाफ किसानों का पैदल मार्च #protest #Bhiwandi   #KisanAndolan #MaharashtraNews

भूमि अधिग्रहण के खिलाफ किसानों का पैदल मार्च #protest #Bhiwandi #KisanAndolan #MaharashtraNews

भिवंडी यातायात विभाग के ई-मेल आईडी बंद पड़े #maharashtranews #bhiwandi #maharashtra #newsupdates

भिवंडी यातायात विभाग के ई-मेल आईडी बंद पड़े #maharashtranews #bhiwandi #maharashtra #newsupdates

छह महीने बाद भी जांच अधूरी, युगेंद्र पयार नाराज #maharastranews #baramati #newsupdate #maharashtra

छह महीने बाद भी जांच अधूरी, युगेंद्र पयार नाराज #maharastranews #baramati #newsupdate...

नांदेड़ सहकारी बैंक चुनाव, मतगणना आज से शुरू #maharashtranews #nanded #maharashtra #newsupdate #news

नांदेड़ सहकारी बैंक चुनाव, मतगणना आज से शुरू #maharashtranews #nanded #maharashtra #newsupdate...

अमरावती में पांच जुआ अड्डों पर पुलिस की रेड

अमरावती में पांच जुआ अड्डों पर पुलिस की रेड

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges