Published On : Mon, Aug 19th, 2019

आजपासून संगणक परीचालकांचे बेमुद्दत कामबंद आंदोलन

कामठी : कामठी तालुक्यात एकूण 47 ग्रामपंचायती चा समावेश असून ग्रामपंचायती मध्ये ग्रामपंचायत चा कारभार हा संगणकीय ऑनलाईन पद्धतीने व्हावा यासाठी 44 ग्रामपंचायती मध्ये संगणक परिचालक कार्यरत आहेत या संगणक परिचालकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना शाखा कामठी तालुक्याच्या वतीने आज 19 ऑगस्ट पासून बेमुद्दत कामबंद आंदोलन पुकारला असून यासंदर्भात आज कामठी तालुका संगणक परिचालक संघटनेच्या वतीने कामठी पंचायत समिती कार्यालय समोर धरणा देत सहाययक गट विकास अधिकारी सुरेश कोल्हे यांना सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.

डिजिटल महाराष्ट्र ही संकल्पना बाळगन्याच्या मुख्य उद्देशाने ऑनलाईन कामकाजासाठी कामठी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती मध्ये संगणक परीचालकांची नेमणूक करण्यात आली आहे .संगणक परीचालकाना महाराष्ट्र आयटी महामंडळामध्ये समावून घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते परंतु आश्वासणाची पूर्तता झाली नाही.महिन्याच्या एक तारखेला मानधन देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते मात्र मागील काही महिन्यांपासून संगणक परीचालकाना मानधन मिळत नाही तेव्हा जोपर्यंत प्रलंबित समस्यांची पूर्तता केली जाणार नाही तोपर्यंत कामठी तालुक्यातील संगणक परिचालक बेमुद्दत काम बंद आंदोलन कायम ठेवणार आहेत .या बेमुद्दत कामबंद आंदोलनाची आजपासून सुरुवात झाली असून यासंदर्भत निवेदन सादर करण्यात आले.

हे निवेदन जिल्हाध्यक्ष सोनू तितरमारे यांच्या नेतृत्वात पंचायत समिती कामठी चे सहाययक गट विकास अधिकारी सुरेश कोल्हे यांना देण्यात आले याप्रसंगी तालुकाध्यक्ष लताताई ढोरे, उपाध्यक्ष आम्रपाली देशभ्रतार, सचिव अर्चनाताई कुरटकर, प्रीती नटे, ममता कुपाले, सचिन ठाकरे , राहुल चारमोडे, अंकुश भेंडे, महादेव दुधपचारे, अस्मित लोखंडे, जागेश्वर कोंगे, विवेक सोनवाणे, शैलेश गजभिये, बिंदू गणवीर, आकाश निखाडे धीरज चव्हाण आदी उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी