Published On : Fri, Mar 8th, 2019

फ्री मेट्रो राईड डे’ला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद, तब्बल ११ हजार प्रवाश्यांनी केला मेट्रोने प्रवास

नागपूर: महा मेट्रो नागपूर आज साजरा करत असलेल्या आभार दिवसाला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसद मिळाला. सकाळी ८ वाजता पासून ‘फ्री मेट्रो राईड डे’ला सुरवात होताच प्रवाश्यांची प्रचंड गर्दी व्हायला लागली होती. पहिल्या दिवशीच तब्बल ११ हजार प्रवाश्यांनी मेट्रोचा प्रवास अनुभवला. सीताबर्डी ते खापरी दरम्यान मेट्रोच्या प्रवास नागरिकांनी केला. ‘फ्री मेट्रो राईड डे’ आम्हाच्या नेहमीच आठवणीत राहील अश्या प्रतिक्रिया नागरिकांनी नागपूर मेट्रोला दिल्या. आभार दिनानिमीत्त माझी मेट्रोचे जोरदार नारे प्रवाश्यांनी लावले.

फ्री मेट्रो राईड करण्यासाठी नागरिकनांमध्ये प्रचंड उत्साह होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक नागपूर मेट्रोच्या स्थानकावर पोहोचत होते. एकूणच मेट्रो आणि स्टेशनपरिसरातील संपूर्ण वातावरण आनंदमय झाले होते.

प्रकल्पाच्या कार्यात नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘फ्री मेट्रो राईड डे’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर *शनिवार, दिनांक ०९ मार्चपासून मेट्रोच्या विनामूल्य तिकीट खरीदी करून मेट्रोने प्रवास करता येणार आहे. मोफत तिकीट घेऊन ए.एफ.सी. प्रणालीने प्रवाश्यांना प्लॅटफ़ॉर्म’वर जाता येईल. तर प्रवास पूर्ण झाल्यानंतर ए.एफ.सी. गेटच्या बाहेर निघाल्यानंतर पुन्हा मेट्रोने प्रवास करण्यासाठी दुसऱ्यांदा विनामूल्य तिकीट नागरिकांना खरीदी करावी लागेल. मेट्रो प्रवासासाठी संपूर्ण कार्यप्रणाली नागरिकांना नागरिकांना समजता यावी यासाठी विनामूल्य तिकीट संकल्पना अमलात आनण्यात येत आहे.

आज झालेल्या ‘फ्री मेट्रो राईड डे’ निमित्य शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुणवर्ग, कार्यालयीन मंडळी, जेष्ठ नागरिक, महिलागण…अश्या सर्व नागरिकांनी मेट्रोचा प्रवास अनुभवला. मेट्रोतून प्रवास करतांना माझी मेट्रो बद्दल अभिमान वाटत असल्याचे अनेकांनी सांगितले. मेट्रोमुळे नागपूरचे नवी ओळख जगात निर्माण झाल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. ‘फ्री मेट्रो राईड डे’ निमित्य महा मेट्रोने तयार केलेल्या नियमावलीचे नागरिकांनी पालन करून अधिकाऱ्यांना सहकार्य केले. प्रवाश्यांना कोणताही अतिरिक्त त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक मेट्रो स्टेशनवर महा मेट्रोतर्फे चोख बंदोबस्त करण्यात आला होता. स्टेशन कंट्रोलर, टेक्नीशियन एवं ऍफ़एम्एस अधिकारी, अनाऊंसर, सुरक्षा सहकर्मी अश्या सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांनी सुव्यवस्थित आपली भूमिका पार पाडली.