Published On : Thu, Dec 6th, 2018

महिला पोलीस अधिका-यासोबत लजास्पद वर्तन

Advertisement

भाजपा पदाधिका-याला अटक करा या मागणी करीता मा.पोलीस आयुक्त यांना निवेदन सादर

राष्ट्रवादी ग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष मा.अनिल अहिरकर यांच्या नेतृत्वात *पोलीस आयुक्त मा.श्री भूषणकुमार उपाध्याय यांची भेट घेऊन त्यांना शहरातील जरीपटका भागात एका महिला पोलीस अधिकाऱ्यांसोबत लाजिरवाने व निर्लज्ज वर्तन करणाऱ्या भाजप पदाधिका ऱ्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले,

जरीपटका सिंधुनगर मैदानात सिंधी समाजाच्या मालकी हक्क पट्टे वितरण कार्यक्रमाच्या दरम्यान एका भाजपा पदाधिका-याने आपले कर्तव्य बजावणा-या एका महिला पोलीस उपनिरिक्षासोबत असभ्य वर्तन केले.

मात्र अजुन पर्यंत जरिपटका पोलीस या आरोपी युवकावर कारवाई करीत नाही ही गंभीर बाब असुन पोलीस विभाग व समाजासाठी चिंतेची बाब आहे.

अश्या प्रकारामुळे पोलीसांच्या मनोधेर्यावर प्रतिकुल परीणाम होतो.

करीता कोणत्याही राजकिय दबावाखाली न येता या आरोपी भाजपा पदाधिकारी असलेल्या युवकावर त्वरीत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावी व तसे आदेश जरिपटका पोलीसांना द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी ग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री.अनिल अहिरकर यांनी केली आहे. तसेच रा.का.पा महिला आघाडी रेखा गौर तर्फे निदर्शने करणात आले.

याप्रसंगी प्रदेश महासचिव प्रविण कुंटे पाटील,विभागीय अध्यक्ष सर्वश्री मिलिंद मानपुरे, विशाल खांडेकर, रवींद्र इटकेलवर, अशोक काटले शैलेश पांडे व महासचिव अविनाश शेरेकर,प्रकाश लीखानकर, व महिला दीपा गौर. पुष्पा नंदनवार, ज्योति गौर, भारती नागरे, माया गजभिये, राजश्री मेश्राम, मीना गौर, मंजु शाहू, लीलाबाई गोसावी, मुन्नी बाई सहारे, उषा गौर, सह महिला उपस्थीत होते.