
नागपूर : फ्री कॉईन आणि मर्चंट कॉईनच्या नावाखाली आकर्षक परताव्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा आर्थिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात नागपूरमधील एजंट मिहुल शिवाजी दीक्षित आणि पंजाबस्थित CLBP System Private Limited Collection कंपनीचा संचालक राकेशकुमार मोहनलाल गर्ग उर्फ राकेश अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे.
पाचपावली पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 399/2026 नुसार, रामनगर येथील रहिवासी रीमा रंजन घोष यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. आरोपींनी FDA (Future Digital Assets) योजनेत गुंतवणूक केल्यास 100 दिवसांत मोठा परतावा मिळेल, तसेच “फ्री कॉईन” आणि “मर्चंट कॉईन”च्या माध्यमातून लाखोंचा नफा होईल, असे सांगून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.
तक्रारदाराला सुरुवातीला कंपनीचे संकेतस्थळ, यूट्यूब व्हिडीओ, टेलिग्राम मिटिंग आणि ऑनलाईन डॅशबोर्ड दाखवून विश्वासात घेण्यात आले. त्यानंतर चेन सिस्टीमद्वारे नवीन सदस्य जोडल्यास दरमहा लाखो रुपयांचे उत्पन्न मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले. या योजनेत तक्रारदारासह 25 गुंतवणूकदारांनी पैसे जमा केले. मात्र, कोणताही परतावा मिळाला नाही.
याशिवाय मर्चंट कॉईनची किंमत भविष्यात एक लाख रुपयांपर्यंत जाणार असल्याचे सांगून तक्रारदाराकडून 2.25 लाख रुपये उकळण्यात आले. ऑनलाईन वॉलेटमध्ये लाखोंची रक्कम दिसत असली तरी ती काढता येत नसल्याचे समोर आले. पैसे परत मागितल्यावर कंपनीच्या नियमांचे कारण देत आरोपींनी टाळाटाळ केली.
तपासादरम्यान फिर्यादीसह 25 गुंतवणूकदारांची सुमारे 5.40 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले. मात्र, या कंपनीच्या व्यवहारांचा सखोल तपास करताना महाराष्ट्रासह विविध राज्यांतील तब्बल 31,117 गुंतवणूकदारांनी 15.58 कोटी नव्हे तर 15.58 अब्ज रुपये (15,58,65,000 रुपये) इतकी रक्कम गुंतविल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात कंपनीशी 10.24 लाखांहून अधिक युजर्स जोडलेले असल्याचे आढळले असून त्यापैकी जवळपास 30 हजार युजर्स नागपूरमधील आहेत. पोलिसांच्या मते, वेळेत गुन्हा दाखल झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांची संभाव्य फसवणूक टळली आहे.
कारवाईदरम्यान आरोपींकडून लॅपटॉप, मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले. तसेच दोन्ही आरोपींची बँक खाती आणि मुदत ठेवी (FD) गोठवून सुमारे 1.72 कोटी रुपयांची रक्कम सुरक्षित करण्यात आली आहे.
मिहुल दीक्षित याला नागपूरमधून तर राकेश गर्ग याला चंदीगड (पंजाब) येथून अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
स्कॉर्पियो में किडनैप... 7 किलोमीटर दूर ले जाकर थर्ड डिग्री... #nagpurnews #crime...
छात्र मुद्दे पर Youth Congress का प्रदर्शन | 'Amit Shah Jawab Do'...
हर घर तिरंगा अभियान का भव्य आगाज; शहर में वितरित होंगे 1.75...
40 लाख की प्लॉट ठगी का नया केस दर्ज, सक्करदरा पुलिस करेगी...
2009 सीडी मामले में उद्धव ठाकरे का बयान #MaharashtraNews #UddhavThackeray #ShivSena #Political
बिना दस्तावेज मध्य प्रदेश की बस जब्त #MaharashtraNews #STBus #RTO #BusChecking #MPBus...




