Published On : Wed, Sep 4th, 2024
By Nagpur Today Nagpur News

भाजपचे चार- पाच नेते पक्षाला ‘या’ कारणाने देऊ शकतात सोडचिठ्ठी;चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

Advertisement

नागपूर : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजायला अवघा अवधी उरला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला सुरुवात झाली आहे. याचा सर्वाधिक फटका भारतीय जनता पक्षाला बसताना दिसत आहे. पक्षातील अनेक बडे नेते इतर पक्षात जाण्यासाठी रांगेत उभे राहिलेले दिसतात. यावर आता स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केल्याने भाजप पक्षाच्या 24 नेत्यांना त्यांच्या भवितव्याची चिंता आहे. जागावाटपामुळे तिकीट न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर चार ते पाच नेते लवकरच पक्ष सोडू शकतात,असा दावा बावनकुळे यांनी केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. मात्र आम्ही या नेत्यांना रोखणार नसल्याचेही ते म्हणाले.

Gold Rate
25 April 2025
Gold 24 KT 96,300 /-
Gold 22 KT 89,600 /-
Silver / Kg 97,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गेल्या वेळी भाजपने इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांना तिकीट दिले होते, मात्र त्यांचा पराभव झाला. आता महायुती झाली नसती तर त्यांना पुन्हा उमेदवारी मिळाली असती. असे 4-5 लोक असतील ज्यांना विधानसभा लढवण्याशिवाय पर्याय नाही. ज्यांना इतरत्र जायचे आहे त्यांच्यासाठी आमचे दरवाजे खुले आहेत. आम्ही कोणालाही रोखणार नाही. तरीही आम्ही त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, असे बावनकुळे म्हणाले.

राष्ट्रवादीबाबत भाजप नेत्याची नाराजी उघड-
राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीत सामील झाल्यापासून भाजप आणि शिवसेना यांच्यात अधूनमधून विरोधाचे आवाज उठताना दिसत आहेत. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचा उघड विरोध केला जात आहे. भाजप असो वा शिवसेना, पक्षातील अनेक बडे नेते जाहीर व्यासपीठावरून अजित पवारांवर हल्लाबोल करत आहेत.

Advertisement
Advertisement