Published On : Wed, Nov 11th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या चौघांना अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Advertisement

नागपुरात एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या चौघांना अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर : शहरात अमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी बेलतरोडी परिसरात मोठी कारवाई केली आहे. वर्धा रोडवरील भारत पेट्रोल पंपाजवळ न्यू पंजाबी ढाब्यासमोरील सर्व्हिस रोडवर उभ्या असलेल्या संशयित एर्टिगा कारवर पोलिसांनी छापा टाकला. या कारमध्ये चार जण आढळून आले. त्यांची झडती घेतली असता भूषण रमेश कुरसंगे याच्याकडे १८ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) सदृश अमली पदार्थ आढळून आला. या कारवाईत पोलिसांनी चौघांना अटक करून कार, मोबाईल आणि अमली पदार्थांसह एकूण १६ लाख ६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सुमारे ९.३० वाजता बेलतरोडी पोलिसांचे पथक वर्धा रोड परिसरात गस्तीवर होते. यावेळी सीजी-०८-वाई-५७६० क्रमांकाची पांढऱ्या रंगाची एर्टिगा कार संशयास्पद स्थितीत उभी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. कारची तपासणी केली असता त्यामध्ये भूषण रमेश कुरसंगे, नितेश सुभाष साहू, मोहित गजानन भाजीपाले आणि सौरभ सतीश लष्करे हे चौघे आढळले. झडतीदरम्यान भूषण कुरसंगे याच्या पँटच्या खिशातून १८ ग्रॅम एमडी सदृश पावडर मिळाली. त्याची किंमत ९१ हजार ७०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय चार मोबाईल आणि अमली पदार्थांच्या व्यवहारासाठी वापरली जाणारी एर्टिगा कार जप्त करण्यात आली. भूषण कुरसंगे याच्याविरुद्ध यापूर्वी बेलतरोडी, सोनेगाव आणि कळमना पोलीस ठाण्यांत पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, या अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा आणि इतर संबंधितांचा शोध सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.