Published On : Sat, Dec 30th, 2017

नागपूरचे माजी नगरसेवक बाबा मैंद यांचे निधन

Advertisement

नागपूर : भाजप नेते आणि माजी नगरसेवक बाबा मैंद (५७) यांचे अल्पशा: आजाराने शुक्रवारी रात्री निधन झाले. मागील काही दिवसांपासून शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात दहा वर्षाचा मुलगा आहे.

सहा महिन्यापूर्वी त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका विशाखा मैंद यांचे अपघाती निधन झाले होते. तेंव्हापासून त्यांना जबर धक्का बसला होता. त्यांनी दोन वेळा महापालिकेत प्रतिनिधित्व केले होते. महापालिकेच्या आरोग्य समितीचे सभापती आणि विविध समित्यांचे सभापती म्हणून त्यांनी काम पाहीले. मैंद यांनी धरमपेठ गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून दीर्घकाळ नागपुराचा सांस्कृतिक वारसा जपला.

Advertisement
Advertisement

धरमपेठच्या चिल्ड्रेन ट्रॉफिक पार्कची मुहर्तमेढही त्यांनी रोवली. विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा संघटनांशी त्यांचा जवळचा संबंध होता. शनिवारी सकाळी ११ वाजता धरमपेठ येथील त्यांच्या राहत्या घरून अंत्ययात्रा निघेल. मैंद यांच्या निधनावर राजकीय वर्तुळातून शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement