| | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Jun 11th, 2020

  काटोल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुनील शिंदे यांचे निधन

  नागपूर : काटोल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तसेच म्हाडा सभापती सुनील शामराव शिंदे (वय ८६ वर्षे) यांचा आज सकाळी काटोल येथे उपचारासाठी नेले असता मृत्यू झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते निकटवर्तीय होते.

  १९८४ ते १९९४ या काळात दहा वर्षे ते काटोल विधानसभेचे आमदार होते. म्हाडाचे सभापती पदसुद्धा त्यांनी भूषविले. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. शेतकऱ्यांच्या संत्र्याला भाव मिळावा याकरिता अनेकदा रस्त्यावर व नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आंदोलने केली.

  आमदार असताना अनेक विकासकामांची गंगा त्यांनी काटोल विधानसभा मतदार संघात आणली. काटोल तालुक्‍यातील डोंगरगाव येथे एम.आय .डी. सी. आणून तिथे औद्योगिक क्रांतीची सुरुवात केली. संत्रा कारखाना सुरू केला होता.

  अशा नेत्याच्या निधनाने राजकीय व सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुले असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्यावर शुक्रवारी (ता. १२) मुळगावी सावरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145