Published On : Tue, Aug 9th, 2022
By Nagpur Today Nagpur News

माजी महापौर दयाशंकर तिवारी सांगणार ७५ क्रांतिवीरांच्या ७५ रोचक प्रसंग

Advertisement

– मंगळवारी सुरेश भट सभागृहात आयोजन : मनपा व लोटस कल्चरल असोसिएशनचा पुढाकार


नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर महानगरपालिका व लोटस कल्चरच अँड स्पोर्टिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी ९ ऑगस्ट रोजी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सायंकाळी ६ वाजता स्वातंत्र्याचा प्रेरणादायी इतिहास सांगणा-या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शहराचे माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी या कार्यक्रमात ७५ क्रांतिवीरांच्या ७५ रोचक प्रसंगांचे वर्णन करणार आहेत.

Gold Rate
Apr 09,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,50,700 /-
Gold 22 KT ₹ 1,40,200 /-
Silver/Kg ₹ 2,39,500/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above


भारतीय स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणारे ७५ क्रांतिवीर जे कधीच कुठल्याही पाठ्यपुस्तकातून अथवा कुठल्याही माध्यमातून त्यांचे कार्य पुढे आलेले नाही अशा स्वातंत्र्य समरातील क्रांतिवीरांची क्रांतिगाथा श्री. दयाशंकर तिवारी सांगणार आहेत.

या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित अभिनव कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement