Published On : Tue, Jul 16th, 2024
By Nagpur Today Nagpur News

माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात ‘क्लीन चीट’!

Advertisement

नागपूर : तत्कालीन माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात त्यांना ‘क्लीन चीट’ मिळाली आहे.या मोहिमेत कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा गैरव्यवहार न झाल्याचे समोर आले आहे. महाविकास आघाडी सरकारने याबाबत आक्षेप घेत अनेक आरोप केले होते. त्यानुसार या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती.

या समितीने दिलेल्या अहवालानुसार कुठलीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला नसल्याचा अहवालात सांगण्यात आले आहे. सोबतच राज्यात मोहिम यशस्वी झाल्याचेही समितीने स्पष्ट केले.

Gold Rate
05 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,700 /-
Gold 22 KT ₹ 93,700/-
Silver/Kg ₹ 1,13,200/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राज्यात तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळातील वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 33 कोटी वृक्षलागवडीची महत्त्वाकांक्षी मोहिमेची घोषणा केली होती. मात्र या मोहिमेत मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत तत्कालीन वनमंत्री दत्ता भरणे यांनी या वृक्षलागवडीच्या चौकशीसाठी समितीची घोषणा विधानसभेत केली होती. या समितीने केलेल्या चौकशीत मुनगंटीवार यांच्यावरील आरोप खोटे सिद्ध झाले आहे.

Advertisement
Advertisement