Published On : Wed, Mar 20th, 2024
By Nagpur Today Nagpur News

पूर्व एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा; हायकोर्टाचा निकाल

Advertisement

मुंबई: पूर्व एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.मुंबई हायकोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर प्रदीप शर्मा यांना येत्या तीन आठवड्यात आत्मसर्पण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.11 नोव्हेंबर 2006 या दिवशी राम नारायणविश्वनाथ गुप्ता उर्फ लखनभैया यांची फेक एन्काउंटरद्वारे हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. याच प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरु होती.

विशेष म्हणजे मुंबई हायकोर्टात हे प्रकरण येण्याआधी कनिष्ठ कोर्टात या प्रकरणी सुनावणी पार पडली. कनिष्ठ कोर्टाने प्रदीप शर्मा यांच्यासह त्यांच्या 12 सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली होती. पण मुंबई हायकोर्टाने त्यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.मुंबई हायकोर्टाने या प्रकरणातील इतर आरोपींनादेखील जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Gold Rate
Saturday18 Jan. 2025
Gold 24 KT 79,600 /-
Gold 22 KT 74,000 /-
Silver / Kg 90,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्रदीप शर्मा यांनी त्यांच्या 13 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह 11 नोव्हेंबर 2006 ला अंधेरीतील सात बंगला येथे फेक चकमक घडवून आणली होती. या चकमकीत त्यांनी लखनभैयाची हत्या केली होती. तसेच लखनभैयाची एन्काउंटरमध्ये हत्या झाल्याचा बनाव रचला होता.

या प्रकरणी लखनभैयाचे वकील रामप्रसाद गुप्ता यांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यांनी सातत्याने कोर्टात युक्तिवाद केला. कोर्टाने या प्रकरणी एसआयटी स्थापन करत चौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणी प्रदीप शर्मा यांना 2008 मध्ये निलंबित करण्यात आले होते. पण पुढे कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केल्यानंतर त्यांचं निलंबन मागे घेण्यात आलं होतं.प्रदीप शर्मा हे 1983 च्या बॅचचे अधिकारी आहेत. ते 2020 मध्ये निवृत्त होणार होते. पण त्याआधीच त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती.

Advertisement