Advertisement
नागपूर: नागपूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर श्री. हरीश राऊत यांचे शुक्रवारी (१६ ऑगस्ट) निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. श्री. हरीश राऊत यांनी २ मार्च १९९२ ते ३ ऑगस्ट १९९२ या कालावधीत नागपूर महानगरपालिकेचे उपमहापौर म्हणून जबाबदारी सांभाळली.
श्री. राऊत हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या गवई गटाचे नेते होते. त्यांनी पक्षाचे नागपूर शहराध्यक्ष म्हणून देखील जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर मनपामध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना उपमहापौर पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
श्री. हरीश राऊत यांच्या पश्चात अश्विन, निखील आणि पूजा राऊत ही मुले आहेत. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी १७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता वैशाली नगर दहन घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.