नागपूर: दैनिक भास्करच्या मुख्य अंकाच्या पहिल्या पानावर सर्वात वर दैनिक भास्कर लिहिले असलेल्या जागेत राष्ट्रीय चिन्ह अशोक चक्रावर संविधानात मान्यता नसलेल्या काल्पनिक भारत मातेला उभ्या असलेल्या स्थितीत छापण्यात आले आहे. मात्र यावरून मोठा वाद निर्माण झाला असून माजी नगरसेवक जनार्दन मून यांनी या प्रकारावर आक्षेप घेतला. त्यांनी या प्रकरणी पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांना पत्र लिहीत माहिती दिली. तसेच यशोधरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली आहे.
दैनिकात काल्पनिक भारत माता राष्ट्रीय चिन्हाला पायदळी तुडवत असल्याचे दाखवले आहे. यावरून देशाचे, राष्ट्राचे राष्ट्रीय झेंड्याचे, चिन्हाचे महत्व कमी करण्याचा हा प्रयत्न संपादकांनी यशस्वी केल्याचे दिसून येत असल्याची टीका मून यांनी केली
भारत देशाच्या राष्ट्रीय चिन्ह अशोक चक्राला पायदळी तुडवले. अशोकचक्राला विद्रूप करून लाखो वाचकांसमोर प्रस्तुत केले.
याद्वारे भारत देशाचा येथील माझ्या सारख्या असंख्य नागरिकांचा अपमान केला. त्यांच्या अस्मितेला ठेच पोहचवली. भारतीय जनतेच्या भावना दुखविल्या. एवढेच नव्हे तर भारतीय नागरिक आणि कट्टरपंथीय असा वाद पेटवून देशात दंगा भडकवीण्याच्या ऊद्देशाने प्रयत्न केला, दंगा भडकून राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होईल, असे त्यांचे मनसुभे उघड झाले असल्याचेही मून म्हणाले.
देशात रक्तपात होईल, देश दोन भागात विभागल्या जाईल असे षडयंत्र रचुन केलेले देशद्रोही कृत्य आहे, याबाबत दैनिक भास्कर च्या मुख्य संपादकाला दि. 16 ऑगस्ट 2024 रोजी 3 दिवसात लेखी खुलासा मागितला होता, त्यांना हे पत्र .17 ऑगस्ट 2024 रोजी प्राप्त झाले परंतू त्यांनी आजपर्यंत ही खुलासा सादर केला नाही किंवा प्रकाशित सुद्धा केला नाही. त्यामुळे वृत्तपत्राला केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या परवानगी, नोंदणीच्या नियमांचे हे सर्रास उल्लंघन आहे.
या दैनिकाच्या 15 ऑगस्ट 2024 ला लाखो प्रति वितरित केल्या. यापूर्वी मून यांनी नागरी हक्क संरक्षण मंचाकडेही तक्रार केली आहे.
नियमानुसार दैनिक भास्करचे मालक, मुख्य संपादक, प्रकाशक, वितरक, मुद्रक यांच्यावर चौकशी करून उचित कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मून यांनी केली आहे.