Published On : Tue, Dec 5th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपूरला हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर छावणीचे स्वरुप ; कडेकोट बंदोबस्त तैनात !

नागपूर : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात ७ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. यापार्श्वभूमीवर उपराजधानीला छावणीचे स्वरूप आले असून कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस विभागाने कंबर कसली आहे. शहरात सुरक्षिततेच्या दृष्टीने अकरा हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या फौजफाटा लावण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

विशेष म्हणजे, यंदा आठ राज्य राखीव दलाच्या कंपनी आणि एक हजार होमगार्डचा समावेश करण्यात आला आहे.अधिवेशनाच्या निमित्त्याने शहरात राज्याचे मंत्रिमंडळ आणि विविध राजकीय नेत्यांची रेलचेल सुरु होते. या अनुषंगाने राज्यभरातून विविध संघटना मोर्चे घेऊन नागपुरात दाखल होतात.

Gold Rate
May 05- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,48,800 /-
Gold 22 KT ₹ 1,38,400 /-
Silver/Kg ₹ 2,47,500/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

हे पाहता त्यांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील पाच हजार तर बाहेरील राज्यातील सहा हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. बाहेरच्या अधिकाऱ्यांमध्ये दहा पोलिस आयुक्त, ५० सहायक पोलिस आयुक्त, ७५ पुरूष पोलिस निरीक्षक आणि २० महिला पोलिस निरीक्षक, अशा एकूण ९५ पोलिस निरीक्षकांचा समावेश करण्यात आलेला आहे. या सर्वांना मंगळवारी (ता.५) रिपोर्टिंग करावयाचे आहे. याशिवाय गोपनिय शाखा, डीबी पथक, ३० बॉम्बशोध व नाशक पथके, डॉग स्क्वॉड आणि विविध पथकांचा समावेश आहे.यंदा अधिवेशनाचा बंदोबस्त ‘हायटेक’ आणि ‘स्मार्ट’ असेल, हे विशेष.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement