मुंबई– मुख्यमंत्री माझी ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या अनेक महिलांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. योजनेच्या पुढील हप्त्यांचा लाभ मिळवण्यासाठी काही लाभार्थी महिलांना पुन्हा एकदा e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. प्रशासकीय स्तरावर झालेल्या बदलांमुळे तसेच बँक खात्याशी संबंधित तांत्रिक कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
योजनेतील काही महिलांच्या खात्यांमध्ये मागील हप्त्यांची रक्कम जमा झालेली नाही. यामागे प्रामुख्याने आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे, खाते निष्क्रिय असणे किंवा अर्जात दिलेल्या माहितीत तफावत असणे ही कारणे असल्याचं सांगण्यात येत आहे. काही प्रकरणांमध्ये प्रणालीत तांत्रिक माहिती अपूर्ण राहिल्यामुळे पुन्हा पडताळणीची गरज निर्माण झाली आहे.
प्रशासनाकडून असं स्पष्ट करण्यात आलं आहे की, ज्या महिलांनी वेळेत e-KYC प्रक्रिया पूर्ण केली, त्यांच्या थांबलेल्या मागील हप्त्यांसह सध्याचा हप्ता एकत्रितपणे खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास पुढील हप्तेही रखडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे लाभार्थी महिलांनी आपल्या बँक खात्याची स्थिती तपासून आधार लिंक आहे की नाही याची खात्री करून घ्यावी, तसेच संबंधित अधिकृत यंत्रणेमार्फत e-KYC प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. वेळेत प्रक्रिया पूर्ण केल्यास योजनेचा लाभ कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहणार असल्याचंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY





