Published On : Wed, Jan 12th, 2022
By Nagpur Today Nagpur News

सामान्य कच-यात जैविक कचरा टाकल्याबद्दल

Advertisement

शोध पथकाने केला दंड वसूल

नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे मनपाच्या धरमपेठ झोन अंतर्गत कोलंबिया हॉस्पीटल, हयात बिल्डींग धंतोली येथे जैविक कचरा सामान्य कच-यासोबत टाकल्याबद्दल रु ५० हजार चा दंड लावण्यात आला. तसेच जवाहर विदयार्थी वस्तीगृह लॉन, लॉ कॉलेज चौक सिव्हील लाईन्स येथे कोविड नियमांचे उल्लंघन करण्याबद्दल रु २५ हजार तसेच ॲलीन अकॅडमी, राजकुमार कॉम्प्लेक्स, पंचशील चौक येथे कोविड नियमांचे उल्लंघन करण्याबद्दल रु १५ हजार दंड लावण्यात आला.

त्याचप्रमाणे हनुमाननगर झोन अंतर्गत संत रविदास सभागृह, हनुमाननगर येथे कोविड नियमांचे उल्लंघन करण्याबद्दल रु ५ हजार तसेच हॉटेल अशोका, मनीष नगर येथेसुध्दा कोविड नियमांचे उल्लंघन करण्याबद्दल रु २५ हजार आणि मंगळवारी झोन अंतर्गत चोपडे लॉन येथे कोविड नियमांचे उल्लंघन करण्याबद्दल रु २५ हजार चा दंड लावण्यात आला.

Advertisement

महाराष्ट्र शासनाद्वारे बंदी आणल्यानंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येताच मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकाने कारवाईला गती दिली आहे. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार बाजारपेठ, दुकान, भाजी बाजारात प्लास्टिक पिशवीमध्ये सामान देणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात येईल व दंडही वसूल करण्यात येणार आहे. गांधीबाग झोन अंतर्गत किशोर लोचट यांच्यावर प्लास्टीक पिशव्यांचा वापर करण्याबाबत रु १० हजारचा दंड करण्यात आला.

उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी १५ प्रतिष्ठानांवर कारवाई करून २ लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला. पथकाने ५२ पतंग दुकानांची तपासणी केली. उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.