Advertisement
कन्हान : शहर बौद्ध बांधव करीता पर्यटक स्थळ म्हणुन ओळखले जाते तर येथून दीक्षाभूमी नागपूर ड्रॅगन पॅलेस कामठी, नागार्जुन विहार मनसर,रामटेक, बुद्धिस्ट पार्क शिहोरा, कन्हान शहरांमधूनच जावे लागते.
.तर धम्म चक्र परिवर्तन दिन निमित्त दूर वरून बौद्ध बांधव येतात व कन्हान या ठिकाणी विश्रांती हि करतात यास्तव त्यांच्या करीता भोजन वितरण कार्यक्रम कन्हान येथे विविध जागी करण्यात आला होता.
बौद्ध विहार पंचशील नगर सत्रापुर द्वारे भोजन दान चा कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन डँनियल शेंडे, नेवालाल पात्रे, समीर मेश्राम, भगवान भौवते, सुरेश वाघमारे, बेबीबाई रंगारी, अनुबाई वाघमारे, इंदूबाई नारनवरे, रमाबाई मोटघरे, श्रुती मोटघरे, निर्मला डोंगरे, सविता रंगारी, शांताबाई रंगारी, रेखा ताई कापसे, व सत्रापुर नगरवाशी हयानी करून यशस्विते करिता परिश्रम घेतले.