नागपूर : सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या पुढाकारातून आयोजित दोन दिवसीय लोककला महोत्सव २३ आणि २४ फेब्रुवारी २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर येथे जल्लोषात पार पडला. पारंपरिक लोककलेच्या विविध आविष्कारांनी नागपूरकर रसिकांना मंत्रमुग्ध केले.
महोत्सवाचा शुभारंभ राज्यगीताने झाला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. यावेळी सांस्कृतिक कार्य विभाग, नागपूरचे सहाय्यक संचालक वसंता खडसे, अधीक्षक कुलदीप कोवे, ज्येष्ठ लोककलावंत, नाट्यकर्मी तसेच महिला कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्याचे सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकार झाला. प्रधान सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संचालक श्रीराम पांडे यांच्या नियोजनातून महोत्सवाचे नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले.
दोन दिवसांच्या या सांस्कृतिक पर्वात जात्यावरच्या ओव्या, फुगडी, डहाका, पारंपरिक आदिवासी नृत्यप्रकार, शेतकरी जीवनाशी निगडित गीते तसेच वारकरी नृत्य यांचे सादरीकरण झाले. ग्रामीण संस्कृतीचा गंध जपणाऱ्या या कलाप्रकारांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कलाकारांवर टाळ्यांचा वर्षाव केला.
समारोप प्रसंगी सहाय्यक संचालक वसंता खडसे यांनी नागपूर विभागाच्या वतीने सर्व कलाकार, मान्यवर आणि उपस्थित रसिकांचे आभार मानत अशा उपक्रमांमुळे लोकपरंपरा जिवंत राहतात, असे मत व्यक्त केले. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवाने नागपूरच्या सांस्कृतिक वातावरणात नवचैतन्य निर्माण केले.
पेपर लीक पर फडणवीस के इस्तीफे की मांग तेज
विकास निधि कार्यों में टेंडर घोटाले, जांच की मांग
पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate
पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...
नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...
हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate





