Published On : Fri, Nov 20th, 2020

नागपुरातून गोव्याकरिता २९ पासून विमानसेवा

Advertisement

नागपूर : हिवाळी वेळापत्रकानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून चार नवीन विमाने सुरू करण्यात येणार आहे. इंडिगो एअरलाईन्स पुन्हा एकदा दिवाळी आणि क्रिसमसच्या सुटीत गोवा विमानसेवा सुरू करीत आहे. विमानाचे संचालन २९ नोव्हेंबर ते २७ मार्चपर्यंत करण्यात येणार आहे. आठवड्यात सर्व दिवस विमान पुणे येथून सायंकाळी ५.२५ वाजता येऊन येथून सायंकाळी ५.५५ वाजता गोवाकडे रवाना होईल.

याशिवाय इंडिगो २९ नोव्हेंबर ते २६ मार्चपर्यंत सकाळी ६.३५ वाजता पुणेकडे विमानाचे संचालन करणार आहे. हे विमान सर्व दिवस राहील. तसेच मुंबईकडे दोन विमानसेवा सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये इंडिगो विमान सकाळी ७.५० वाजता आणि गो एअर रात्री ८ वाजता रवाना होईल. सध्या नागपुरातून दिल्ली, मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, पुणे आणि अहमदाबाद या सात शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. दररोज केवळ १२ विमाने विभिन्न मार्गावर जात आहेत. यामध्ये मुंबई आणि दिल्लीकरिता सर्वाधिक उड्डाणे आहेत. पुणेकरिता दोन आणि बेंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, हैदराबादकरिता केवळ एक विमान चालविण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement