Advertisement
कामठी :- कांग्रेस सेवादल चे कामठी शहर अध्यक्ष मो सुलतान यांच्या पाच वर्षीय मुलगा मोहम्मद आलमगीर अशरफ मो सुलतान यांनी आपल्या जीवणातील पहिला रोजा उपवास ठेवला.
सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात पहाटे सकाळी 4.15वाजेपासून ते सायंकाळी 6.30पर्यंत रोजाच्या नियमानुसार दिवसभर अन्न व पाणी न घेता उपाशी पोटो राहून अल्लाह प्रति श्रद्धा व्यक्त केली.आलीशा सिद्दीकी हिने ठेवलेला रोजा थक्क करणारा ठरला आहे.
भारत देश कोरोना मुक्त होण्यासाठी अल्लाह कडे दुवाच्या माध्यमातून मो आलमगीर अशरफ ने साश्रु नयनाने साकडे घातले आहे .तर या चिमुकल्याने पहिला रोजा ठेवल्याबद्दल मो आलमगीर अशरफ याचे आई, वडील, आजी आजोबा , कडून सर्वत्र कौतुक होत आहे.