Published On : Thu, Oct 1st, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरच्या नंदनवनमध्ये मध्यरात्री हवेत गोळीबार; हसनबाग फ्लायओव्हरखाली खळबळ!

Advertisement

नागपुरच्या नंदनवनमध्ये मध्यरात्री हवेत गोळीबार; हसनबाग फ्लायओव्हरखाली खळबळ!

नागपूर : नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हसनबाग फ्लायओव्हरखाली मध्यरात्री हवेत गोळीबार झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास डीएल मोटर्ससमोर कारमधून आलेल्या ३ ते ४ जणांपैकी एकाने कथितरित्या हवेत गोळी झाडल्याची माहिती आहे. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर कारमधील संशयित घटनास्थळावरून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलिसांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली असून, संशयित कारबाबत महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती आहे.

दरम्यान, या गोळीबाराच्या घटनेत महाल परिसरातील एका कुख्यात गुन्हेगाराचा सहभाग असण्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

गोळीबार नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला, तसेच या घटनेत कोणाचा सहभाग आहे, याचा तपास नंदनवन पोलीस करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संशयितांचा शोध सुरू आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.