Published On : Tue, Dec 5th, 2023
By Nagpur Today Nagpur News

व्हिडीओ ; नागपुरातील जामठा येथे गहू आणि तांदळाने भरलेल्या ट्रकला भीषण आग !

Advertisement

नागपूर : शहरातील जामठा क्रिकेट स्टेडियमजवळ आज पहाटे ४ वाजता गहू, तांदूळ आणि इतर खाद्यपदार्थांनी भरलेल्या ट्रकला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही आग इतकी भीषण होती काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केले आणि ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. नागपूरची एमआयडीसी अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. यादरम्यान आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात आले. १ तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली.

आगीत संपूर्ण ट्रक आणि त्यात भरलेले धान्य जळून खाक झाल्याची माहिती आहे. अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगीचे मुख्य कारण ट्रकमधील वायरचे शॉर्ट सर्किट असल्याचे सांगण्यात येत आहे.या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.