Advertisement
मुंबई: भिवंडीतील सरदार कंपाऊंडमधील भंगार गोदामाला आज पहाटे 6 वाजता लागलेल्या भीषण आगीत किमान 23 गोदामे जळून खाक झाली आहेत. ही सर्व गोदामे प्लॅस्टिकची असल्याने आग धुमसत आहे.
या आगीत काही रहिवासी लोकांच्या झोपड्या खाक झाल्याचे समोर येत आहे. या आगीत कोणतेही जीवित हानी झाली नसली तरी 15 ते 20 लोकांना आगीतून वाचविण्यात यश मिळवले आहे.
प्लॅस्टिकची गोदामे असल्याने आग आटोक्यात आणण्यास अडचण येत आहे. या भागात धुराचे लोट मोठ्या प्रमाणात पसरल्याने परिसरातील रहिवाशांना श्वसनाचा त्रास होत आहे.
या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या आगीवर नियंत्रण मिळवत आहेत. मात्र, प्लॅस्टिकमुळे आग आटोक्यात आणण्यास अडथळा येत आहे. घटनास्थळी पोलिस, महापालिका व अग्निशामक दलाचे अधिकारी उपस्थित झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.