Published On : Tue, Feb 10th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील उप्पलवाडी एमआयडीसी येथे पेपर मिलमध्ये अग्नितांडव; १० ते १२ बॉयलर सिलेंडरचा स्फोट!

Advertisement

नागपूर: नागपूरच्या उप्पलवाडी MIDC परिसरात असलेल्या एका पेपर मिलमध्ये अचानक भीषण स्फोटांची मालिका घडली. प्राथमिक माहितीनुसार, मिलमध्ये कार्यरत असलेले १० ते १२ बॉयलर सिलेंडर एकामागोमाग एक फुटले. या स्फोटांमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला असून आवाज दूरवरपर्यंत ऐकू आले.

घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासनाच्या पथकांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. सुरक्षेच्या कारणास्तव परिसर सील करण्यात आला असून मिलमधील कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

दरम्यान, स्फोटाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. बॉयलरमधील तांत्रिक बिघाड किंवा दाब वाढल्यामुळे स्फोट झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनाकडून घटनेचा सखोल तपास सुरू असून नुकसान व संभाव्य जीवितहानीबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.