Published On : Wed, Nov 23rd, 2022

VIDEO कळमना : मिरची मार्केटमध्ये आग; कोट्यवधींचं नुकसान

नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Kalmana Agricultural Produce Market Committee Nagpur) परिसरात भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही घटना मध्यरात्री दोन वाजन्याच्या सुमारास घडली. या आगीमध्ये एका शेडमध्ये ठेवलेली कोट्यवधी रुपयांची लाल मिरची (Red chili) जळून खाक झाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. दरम्यान, काही तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. मात्र या आगीच्या घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये बाजार समिती प्रशासनाविरोधात रोष निर्माण झाला आहे.

मोठा आर्थिक फटका

Advertisement

मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही लागली होती. आग भीषण असल्यामुळं काही वेळातच एका शेडमध्ये ठेवलेली कोट्यवधी रुपयांची लाल मिरची जळून खाक झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना बसला आहे. दरम्यान, घटनेची माहती मिळताच तत्काळ अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं. मात्र, नागपूर कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती ही नागपूरच्या वेशीवर आहे. तिथपर्यंत अग्निशामक दलाच्या गाड्या पोहोचेपर्यंत आग चांगलीच भडकली होती.

यामध्ये व्यापाऱ्यांनी ठेवलेली लाल मिरची जळून खाक झाली. सध्या अग्निशामक दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. मात्र, व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement