Published On : Thu, Jun 8th, 2017

उर्वरीत कामे त्वरित पूर्ण करा : संदीप जाधव


नागपूर
: रखडलेली उर्वरीत कामे त्वरित पूर्ण करा, दोन ते तीन महिन्यात सभागृहाचे काम पूर्ण करा, असे निर्देश नागपूर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती संदीप जाधव यांनी दिले.

रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहाची पाहणी करीत श्री. संदीप जाधव यांनी कामाचा आढावा घेतला. त्यांच्यासमवेत ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र (बाल्या बोरकर), अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, अधीक्षक अभियंता दीपक सोनटक्के, कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, उपअभियंता सी. आर. गभणे, शाखा अभियंता शकील नियाजी, रवी बुरांडे उपस्थित होते.

सभागृहात पिण्याच्या पाण्याची सोय, अग्निशमन व्यवस्था त्वरित लावावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. सद्यस्थितीत सभागृहाचे सिव्हील स्ट्रक्चरचे काम पूर्ण झाले असून आता स्थापत्य व्यतिरिक्त वातानुकूलित व्यवस्था, बैठक व्यवस्था, अकॉस्टीक्स, लॅन्डस्केपींग, सुरक्षाभिंत आदी कामे सुरू आहेत. संपूर्ण व्यवस्थेसह सभागृहाची कामे दोन महिन्यात पूर्ण होईल, अशी माहिती अभियंता नियाजी यांनी दिली. आतापर्यंत ५२ कोटीचे काम पूर्ण झाले असल्याचीही माहिती यावेळी त्यांनी दिली.

Gold Rate
18 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,900 /-
Gold 22 KT ₹ 1,02,200 /-
Silver/Kg ₹ 1,26,500/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above


नागपूर शहरातील मध्य, पूर्व व दक्षिण नागपुरातील जनतेकरीता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहाच्या धर्तीवर रेशीमबाग येथे नागपूर महानगरपालिकेद्वारे कवीवर्य सुरेश भट सभागृहाचे बांधकाम सुरू आहे.. १५७९६ चौ.मी. क्षेत्रात हे सभागृह तयार करण्यात येत असून ९६८० चौ.मी. क्षेत्रात बांधकाम आहे. २०० कार, ६०० स्कूटर, ६०० सायकल इतकी वाहने एकाचवेळी पार्क करता येतील एवढी पार्किंग व्यवस्था तळघरात करण्यात आली आहे. तळ मजल्यावर व्ही.आय.पी. वाहनतळ व्यवस्था, एकूण दोन हजार आसन क्षमता असलेले प्रेक्षागृह, प्रत्येकी २० व्यक्ती क्षमता असलेल्या दोन लिफ्ट, उच्च क्षमतेची ध्वनी व्यवस्था, अत्याधुनिक विद्युत व्यवस्था, आकर्षक लॅडस्केपींग, जनरेटर इत्यादी व्यवस्था सभागृहात राहणार आहे. सभागृहाच्या गाभाऱ्यात २४ फूट व्यास असलेल्या ‘कॅली’ या कंपनीचा पंखा बसविण्यात आला आहे.

सभागृहाचे कंत्राट मे. सादिक ॲण्ड कंपनी व मे. सुपर कन्स्ट्रक्शन कंपनी यांना सोपविण्यात आले असून या बांधकामासाठी अंदाजे ७७.५० कोटी इतका खर्च लागणार आहे. या प्रकल्पाचे वास्तुशास्त्रज्ञ म्हणून अशोक मोखा हे काम पाहत आहेत, अशी माहिती नियाजी यांनी दिली.

Advertisement
Advertisement