Published On : Fri, Nov 13th, 2020

मास्क न लावणा-या २३० नागरिकांकडून दंड वसूली

Advertisement

आतापर्यंत १९०३९ व्यक्तिं विरुध्द कारवाई

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी गुरुवारी (१२ नोव्हेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २३० नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी १९०३९ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. ७८,७८,५००/- चा दंड वसूल केला आहे.

Gold Rate
July 23 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,900 /-
Gold 22 KT ₹ 1,35,400 /-
Silver/Kg ₹ 2,27,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कोरोना विषाणूचा संसर्गाचा अदयापही धोका टळला नसताना अनेक ठिकाणी सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. नागरी भागात तर ‍विनामास्क नागरिक फिरतांना दिसतात ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाव्दारे अशाप्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणा-या नागरिकांवर कडक कारवाई करीत आहे.

Advertisement

गुरुवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत २६, धरमपेठ झोन अंतर्गत ५३, हनुमाननगर झोन अंतर्गत २३, धंतोली झोन अंतर्गत १४, नेहरुनगर झोन अंतर्गत ११, गांधीबाग झोन अंतर्गत १५, सतरंजीपूरा झोन अंतर्गत १६, लकडगंज झोन अंतर्गत ८, आशीनगर झोन अंतर्गत २३, मंगळवारी झोन अंतर्गत ३७ आणि मनपा मुख्यालयात ४ जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत १३५६९ बेजबाबदार नागरिकांकडून रु ६७ लक्ष ८४ हजार ५०० वसूल करण्यात आले आहे.

Advertisement
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam #news

धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...

Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी #CyberFraud #InstagramScam #Fraud #JobScam

Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...

₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV #CrimeBranch #news

₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...

पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute  #VikasThakre #PoliceAction

पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction

रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news

रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news

RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews #nagpur #nagpurnews #news

RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges