कन्हान : – आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढत असताना तक्रार करूनही कन्हान पोलीस त्याकडे कानाडोळा करित अस ल्याने फसवणूक करणाऱ्याचे चांगलेच फावत असुन तक्रार कर्त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सोसावा लागत आहे.
असेच एक आर्थिक फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहे. रायनगर कन्हान येथील अशोक शामराव सरोदे यांना कर्जावर फर्निचर घेऊन देतो असे म्हणुन आधार कार्ड, पँन कार्ड, बँक पास बुक यांचे झेरॉक्स घेऊन कन्हान येथील सलिम सिद्दीकी यांनी जाफर नगर नागपु रातील दुकानात घेऊन गेला. कागदपत्रा ची पूर्तता केल्यानंतर मार्च २०१९ ला कँपिटल येथुन ५४,००० रूपये तर एचडीएफसी बँकेकडुन ७०,००० रूपये कर्ज मंजुर झाल्याचे सांगण्यात आले.
पण सरोदे यांच्या खात्यावर रूपये ही जमा झाले नाही. आणि दुकानातुन पलंग व सोफा फर्निचर ही मिळाले नाही. परंतु काही दिवसांनी कर्ज पुरवठादार बँकेनी किस्त देण्याचा तगादा लावला.
कोणताही आर्थिक व्यवहार झाला नस ताना सदर बँकेची किस्त कशी भरणार या विवंचनेत असुन फसवणुक झाल्याचे लक्षात येताच या संबंधात कन्हान पोली स स्टेशनला श्री अशोक सरोदे यांनी तक्रार दाखल केली आहे. पण तक्रारीला पंधरा दिवस लोटुनही संबंधितावर कोण तीही कारवाई न केल्या मुळे कन्हान पोलीसांविषयी सर्वसामान्य नागरिकांत तिव्र संताप व्यकत होत आहे.
