Published On : Wed, Apr 8th, 2026
By Nagpur Today Nagpur News

एसटीची आर्थिक भरारी; शालेय सहलींमुळे मिळाला १२७ कोटींचा महसूल

Advertisement

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शालेय सहलींच्या माध्यमातून लक्षणीय उत्पन्न मिळवत विक्रम प्रस्थापित केला आहे.

राज्यभरात सुमारे २५ हजार ५५८ बस फेऱ्या चालवत एसटीने लाखो विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षितपणे पूर्ण केला आणि यामधून १२७ कोटी १८ लाख रुपयांचा महसूल मिळवला. हा महसूल मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल ३३ कोटी २९ लाखांनी अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सहलींसाठी एसटी सेवा ही सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वोत्तम पर्याय ठरत आहे. शैक्षणिक सहलींत धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना मोठ्या प्रमाणात भेटी दिल्या जातात, आणि यासाठी एसटीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे.

सरकारकडून एसटीच्या सहलींवर अर्ध्या भाड्याची (५०%) सवलत दिली जात असल्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांचा कल एसटीकडे वाढला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा विशेष लाभदायक ठरत आहे.

Advertisement

यंदा सहलींसाठी अद्ययावत आणि सुसज्ज बसांचा वापर करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व आरामदायी झाला आहे. पुढील शैक्षणिक वर्षातही शैक्षणिक संस्थांनी खासगी वाहनांऐवजी एसटी सेवेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.