Published On : Tue, Feb 15th, 2022
By Nagpur Today Nagpur News

अखेर आदित्य ठाकरे साहेबाने नांदगाव वासीया च्या व्यथा ऐकुण घेतल्या

– खापरखेडा च्या राखेने व कोळशा खदान, कोल वासरी च्या धुळ प्रदुर्षन बंद करिता दिले निवेदन.

कन्हान : – खापरखेडा औष्णिक विधृत केंद्राच्या नांद गाव – बखारी येथील नवनिर्मित राख तलावामुळे नांद गाव, बखारी व एंसबा गावच्या ग्रामस्थाना च्या शेती च्या जमिनी अधिग्रहण करण्यात आल्या परंतु प्रकल्प ग्रस्ताना नौक-या, योग्य मोहबदला व बेरोजगार झाले ल्याना रोजगार न देता तसेच नांदगाव ग्रा प ची नाहर कत घेता. या तलावात पाईपलाईनद्वारे पाण्याच्या साह्याने राख विसर्जन करण्यात येत असल्यामुळे भूजल प्रदूषणाच्या समस्येने अक्राळ विक्राळ रूप धारण करित वायु व जल प्रदुर्षणामुळे परिसरातील ग्रामस्थ, शेती, जनावरांचे भंयकर नुकसान होत अस ल्याने नांदगाव ग्रा प सरपंच, उपसरपंच, सदस्य सह ग्रामस्थाच्या फिर्यादी ने पर्यावरण मंत्री मा. ना आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने प्रशासकीय अधिकारी खडबडु न जागे झाले आणि तीन दिवसापुर्वी खापरखेडा औष्णिक वीज केंद्राने राख विसर्जन बंद केल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. नांदगाव परिसराला प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थाच्या व्यथा ऐकुण घेत योग्य कार्यवाहीचे निर्देश दिल्याने नऊशे लोक वस्तीचे खेडे जिल्ह्यात चर्चेला आले आहे.

Gold Rate
28 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,21,000 /-
Gold 22 KT ₹ 1,12,500 /-
Silver/Kg ₹ 1,46,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

खापरखेडा औष्णिक विधृत केंद्रातुन निघणारी राख जमा करण्याकरिता पेंच नदीला लागुनच नांदगा व – बखारी येथे नवनिर्मित राख तलावाकरिता ९० शेतक-यांच्या शेत जमिनी घेण्याचे २००३ ला निश्चित करून २००६ ला जमिनी अधिग्रहण करून प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली तेव्हा पासुन नांदगाव, बखारी च्या ग्रामस्थाना विधृत केंद्राकडुन टालमटोल करित असल्याने अनेकदा ग्रामस्थानी आंदोलन करून नौक री, रोजगार, योग्य मोहबदला गावाचे पुनर्वसनाची मागणी धरून ठेवली आहे. परंतु विधृत केंद्राचे अधिकारी वेळ मारून नेत फक्त १३ कुंटुबाच्या एक एक असे १३ व्यक्तीना प्रकल्पग्रस्त म्हणुन नौकरी खापरखेडा विधृत केंद्रात कंत्राट पध्दतीने दिल्या. काहीना काही अडचणी सामोर करून अजुनही ७७ कुंटुबाना नौकरी मिळाली नसुन मोहबदलाही योग्य न मिळता या तलावात पाच वर्षा पासुन बाहेर चे लोक अवैध मासेमारी करित आहे.

येथे लावण्यात आलेली खाजगी सुरक्षा रक्षक सुध्दा बाहेचे व्यकती काम करित आहे. ज्याच्या शेती गेली ते मात्र इकडे तिकडे बाहेर गावी काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करित आहे. मागील २०२१ पासुन खापरखेडा विधृत केंद्रा तुन १६ किमी लांब असलेल्या पारशिवनी तालुक्या तील नांदगाव-बखारी तलावाचे काम पुर्ण झाल्यानंतर राख विसर्जन करण्यास सुरूवात केल्याने पाण्या सोबत येणारी राख आणि तेच पाणी पंपाच्या साह्याने पेंच नदीत सोडत असल्यामुळे तसेच राख मिश्रित पाणी जमिनीत मुरत असल्याने जलस्तोत्र प्रदूषित झाले आहेत. त्यामुळे नदीतुन पाण्याच्या टाकी मध्ये येणारे पाणी तसेच हांत पंप, विहीरीचे पाणी प्रदूषित झाले आहे. परिणामी अनेक आजारांना नांदगाव वासियांना सामोरे जावे लागत आहे.

शेतपिकाचे नुकसान होणे सुरू झाल्याने परिसरातील ग्रामस्थाना भंयकर त्रास सहन करावा लागत असल्याने स्थानिय जनप्रतिनीधीना, तहसिलदार, एचडीओ ना वारवांर फिर्याद केली तरी योग्य सहकार्य न मिळाल्याने नांदगाव ग्रामस्थानी सरपंचा सोनाली मनोज वरखडे, उपसरपंच सेवक कृष्णाजी ठाकरे हयानी प्रशासनाला व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साहेबाना तक्रारीची दखल घेत सोमवार (दि.१४) ला १२ नांदगाव भेट देऊन पेंच नदी लगत असलेल्या पंप हाऊस जवळ पाहणी करून नांदगाव ग्रामस्थाच्या व्यथा जाणुन घेत राख व कोळश्यामुळे होणारे प्रदुर्षन त्वरित बंद करून योग्य कार्यवाही करण्याचे संबधिता ना निर्देश देण्यात आले.

याप्रसंगी देवाजी ठाकरे, रामभाऊ ठाकरे, धर्मेंद्र रच्छोरे, अजयसिंह राजगि-हे, रवि रच्छोरे, संतोष उपाध्ये, निलेश गिरी, देवचंद चव्हाण, दशरथ गिरी, रामकृष्ण शिंदेमेश्राम, ललीत धानोले, प्रताप रच्छोरे, राज ठाकरे, लताबाई ठाकरे, माया पु-हे, विमल धुर्वे, ज्योती ठाकरे, ज्योती रच्छोरे , अश्विनी ठाकरे सह मोठया संख्येने नांदगाव, बखारी, डुमरी स्टेशन, एंसबा , वराडा, वाघोली परिसरातील व प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ बहु संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement