
जळगाव : मागील १७ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाताने ज्यूस पिऊन उपोषण सोडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करून पुन्हा एकदा त्यांची समजूत काढली. यानंतर त्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी आपलं १७ दिवसांचं उपोषण सोडले. आज सकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सराटी गावात जरांगेंची भेट घेण्यासाठी निघाले आणि सकाळी ११ च्या सुमारास आंदोलनस्थळी दाखल झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: जोपर्यंत येत नाहीत. तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले होते.
मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगेंनी राज्य सरकारला महिन्याभराचा कालावधी दिला आहे. तसेच, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने याआधीच जाहीर केला आहे. त्याशिवाय, ज्यांच्या वंशावळीत कुणबी उल्लेख आहे, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचंही सरकारने मान्य केले.
दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची क्षमता, धाडसी निर्णय घेण्याची क्षमता राज्यात कुणामध्ये असेल, तर ती एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
नागपुर में आधी रात घर में घुसकर युवती से लूट #nagpurnews #crime...
मात्र 10 मिनट में 10 लाख के मोबाइल फोन चोरी कर हुआ...
NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 27 JUNE 2026 #newsupdate...
नागपुर में देह व्यापार का भंडाफोड़ #nagpurnews #Crime #prostitute #NewsUpdate #latestnews
नागपुर के प्रतापनगर में खड़ी दो गाड़ियों में लगाई आग #nagpurnews #NewsUpdate...








