Published On : Fri, Jan 19th, 2018

नागपुर च्या जनतेने शिक्षण कर का भरावा ? म.न.पा तील गरीब विद्यार्थी सवलती पासून वंचित:युवक काँग्रेसचे आंदोलन

Advertisement

नागपुर: नागपुर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बंटी बाबा शेळके यांच्या मार्गदर्शनात तसेच दक्षिण नागपुर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष चक्रधर भोयर,मध्य नागपुर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष नवेद शेख व युवक काँग्रेसचे प्रणीत मोहोड़ यांच्या नेतृत्वात देवड़िया काँग्रेस भवन समोर म.न.पा तील गरीब विद्यार्थाना थंडीचे स्वेटर मिळण्याकरिता तीव्र आंदोलन व नारे निदर्शने करण्यात आले. नागपुर महानगर पालिका करदात्यापासुन म.न.पा शिक्षण कर व रा.स.शिक्षण कर हे दुहेरी कर वसूल करतात. म.न.पा त २५००० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहे. पण त्या विद्यार्थाना कुठलीच सुविधा म.न.पा पुरवित नाही. साधे पिण्याच्या पाण्याची,संडास बाथरूम व्यवस्था कर देऊन ही करत नाही यंदा वह्या पुस्तके, गणवेश ही वितरित केले नाही शाळा सुरु व्हायच्या वेळेस शिक्षण सभापती दिलीप दिवे व महापौर नंदा जिचकार यांनी आश्वासन दिले होते की विद्यार्थांना वह्या पुस्तके गणवेष व थंडीचे स्वेटर उपलब्ध करून देऊ वह्या पुस्तके दिलेच नाही आता हिवाळा ही संपला तरी स्वेटर चा पत्ता नाही नागपुर कर जनता लाखो रुपये कर भरतात त्यात शिक्षण कर चा ही समावेश असतो मग शिक्षण कर वसूल केल्यावरही गरीब विद्यार्थाना सुविधा पुरवित नाही मग नागपुर च्या करदात्याने शिक्षण कर का भरावा ?

आणि इकडे केंद्र विद्यालयाच्या बाता करून राहिले आहे एवढा विरोधाभास होय असे बंटी शेळके म्हणाले. पहिले प्राथमिक शिक्षण व्यवस्थित दया मग केंद्रीय विद्यालयाबाबत विचार करा. इतर कार्यक्रमावर लाखो करोड़ो रूपयांचा चुराडा करीत आहे.सीमेंट रोड च्या माद्यमातून म.न.पा ची तिजोरी रिकामी केली.

पालकांचा रोष मुख्यध्यापक व शिक्षकांवर आहे. त्यांना असे वाटते की शिक्षकानीच स्वेटर,गणवेष गडप केले. असेच धोरण राहिले तर विद्यार्थांची संख्या कशी वाढणार तसेच शिक्षकांच्या कित्येक जागा रिक्त आहे. त्यांची भरती करीत नाही काही शाळा तर मोडकीस आल्या आहे. व काही शाळावर म.न.पा तील सत्ताधारी नगरसेवकांचा ताबा आहे. त्या शाळा आपल्या खाजगी कामासाठी व वैयक्तिक कार्यालयासाठी उपयोग करीत आहे आम्हाला महापौराकडून कुठल्याच न्यायाची आशा नाही. आम्ही आयुक्तांना या प्रकरणाकडे लक्ष वेधन्यासाठी आन्दोलनाच्या भूमिकेतून गरीब विद्यार्थासाठी रस्त्यावर उतरून त्यांना त्यांच्या हक़्क़ व न्याय मिळविण्यासाठी शेवटपर्यंत लढ़ा देऊ असे आव्हान नगरसेवक बंटी शेळके यांनी केले. या आंदोलनात चक्रधर भोयर, नवेद शेख, प्रणीत मोहोड़, स्वप्निल ढोके, फजलुर कुरेशी, जावेद शेख, राजेंद्र ठाकरे, तुषार मदने, अखिलेश राजन, निखिल कापसे, अक्षय घाटोले, चेतन समुद्रे, सुशांत सहारे, निखिल वांढरे,फरदीन खान, मन मेश्राम, पियुष खड्गी, आकाश वांढरे,राहुल मोहोड़, हर्षल लाहुले,प्रज्वल शनिवारे, प्रफुल इजनकर,पंकेश निमजे, नकिल अहमद, हेमंत कातुरे,सागर चव्हाण, अतुल मेश्राम, पूजक मदने, आशीष लोनारकर, प्रतीक ठोम्बरे, जावेद कुरेशी इत्यादि कार्यकर्ते उपस्तिथ होते.