Published On : Thu, Mar 4th, 2021

स्थायी समिती सभापती पदासाठी एकमेव नामनिर्देशन दाखल

शुक्रवारी होणार निवडणूक


नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी गुरूवारी (ता.४) नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे या पदासाठी भारतीय जनता पर्टीचे एकमेव उमेदवार प्रकाश भोयर यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. त्यामुळे ही निवडणूक अविरोध होईल. शुक्रवारी (ता.५) पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडेल.

मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांनी उमेदवारांचे अर्ज स्वीकारले. यावेळी अधीक्षक दत्तात्रय डहाके, वरिष्ठ लिपीक सुरेश शिवणकर, राजस्व निरीक्षक विलास धुर्वे आदी उपस्थित होते.

नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी प्रकाश भोयर यांच्या सोबत स्थायी समिती सभापती विजय झलके, नगरसेवक संजय बालपांडे, नगरसेविका सर्वश्री भारती बुंडे, विशाखा बांते, प्रगती पाटील आदी उपस्थित होते.

नामनिर्देशन पत्राची छाननी, उमेदवारी मागे घेण्याची प्रक्रिया तसेच निवड झालेल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याद्वारे शुक्रवारी (ता.५) करण्यात येणार आहे.