Published On : Fri, Apr 2nd, 2021

लग्नाचे आमिष देऊन लैंगिक छळ करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या न्यू येरखेडा रहिवासी एका 23 वर्षीय तरुणीशी कामगार नगर रहिवासी 23 वर्षीय तरुणाचे फेसबुक च्या माध्यमातून झालेली मैत्री ही प्रेमसंबंधात बदलली.

दरम्यान दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचे ठरवीत साक्षगंध करून घेतले त्यानंतर तरुणीची इच्छा नसतानाही आरोपी तरुण हा आता साक्षगंध तर झालेच आहे लवकरच लग्न करू असे विश्वासित करून विळोवेळी शारीरिक संबंध स्थापित केले तर लग्न करण्याची वेळ जवळ येताच आरोपी तरुणाने तिच्या चारित्र्यावर संशय निर्माण करून लग्नास स्पष्ट नकार दिल्याची घटना 31 मार्च 2021 दरम्यान घडली असून यासंदर्भात पीडित फिर्यादी तरुणी ने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी निलेश भास्कर मेश्राम वय 23 वर्षे रा कामगार नगर कामठी विरुद्ध भादवी कलम 376(2)एन 417 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

संदीप कांबळे कामठी