Published On : Tue, Dec 12th, 2023
By Nagpur Today Nagpur News

लढेंगे-जितेंगे !! बाबा , तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा; वडील शरद पवारांसाठी सुप्रिया सुळेंची खास पोस्ट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज ८४ वा वाढदिवस असून यानिमित्ताने त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी खास पोस्ट लिहिली आहे. याबरोबर व्हिडीओ कॉलद्वारे टिपलेला स्क्रीनशॉटही त्यांनी शेअर केला.

आधी लढाई जनहिताची”,असे कॅप्शन सुप्रिया सुळेंनी आपल्या पोस्टला दिले. “प्रिय बाबा, आज तुमचा वाढदिवस. खरं तर तो केवळ आमच्यासाठी वाढदिवस, तुम्हाला सर्व दिवस सारखेच. लोक तुमचे सांगाती आणि तुम्ही लोकांचे सांगाती”, असे सुळे म्हणाल्या.मायबाप जनतेच्या शुभेच्छा, आशिर्वाद आणि डॉक्टरांची अनमोल साथ यांच्या बळावर साहेब आज आपण वयाची त्र्याऐंशी वर्षे पूर्ण करत आहात. ही मोठी आनंदाची बाब आहे. आम्ही सर्वजण त्यांच्याप्रती अंतःकरण पूर्वक कृतज्ञ आहोत. कालही तुम्ही कांद्याच्या प्रश्नावर भूमिपुत्रांसोबत नाशिकच्या रस्त्यावर होतात. तोच आणि तशाच जनहिताच्या प्रश्नांची तड लावण्याचा प्रयत्न मी इथे संसदेत सगळी ताकद पणाला लावून करते आहे.

Gold Rate
12 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,100 /-
Gold 22 KT ₹ 1,02,400 /-
Silver/Kg ₹ 1,28,300/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मला अनेकांनी विचारले आज संघर्ष यात्रेसाठी नागपुरात येणार का? पण आपण कायम केलेल्या मार्गदर्शनानुसार आपल्या बारामती लोकसभा मतदार संघातील आणि राज्यातील जनतेचे मुद्दे घेऊन मी सभागृहात लढते आहे. आजी शारदाबाई (बाई) आणि आजोबा गोविंदराव आबा यांनी जे जनसेवेचे व्रत आपणावर सोपवले आहे, त्याच्याशी आयुष्यभर आपण कटिबद्ध आहोत. जनहिताची पूर्ती होणं हाच तुमचा ध्यास आणि आनंद आहे. तुम्हाला त्यासाठी आम्ही सर्व साथ-सोबत असणे म्हणजेच तुमचा वाढदिवस साजरा करणं होय, असे त्या म्हणाल्या.

संघर्षाच्या या काळात आपण सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून यशस्वी व्हाल याचा आम्हा सर्वांनाच सार्थ विश्वास आहे. लढेंगे-जितेंगे !! बाबा , तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, असे म्हणत सुळेंनी वडील शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या.

Advertisement
Advertisement