Advertisement
नागपूर : नागपूरच्या मोक्षधाम संकुलात असलेल्या धान्य गोदामाला सोमवारी रात्री अचानक आग लागली. आगीच्या ज्वाळा इतक्या तीव्र होत्या की त्या दूरवरून दिसत होत्या, त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गोदामाजवळ वाहनांचे शोरूम व इतर दुकानेही असल्याने आग आणखी पसरण्याची शक्यता होती.
आग लागल्याचे पाहून स्थानिक नागरिकांनी तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्याचे काम सुरू केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली.
या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून सुदैवाने गोदामात ठेवलेले लाखो रुपये किमतीचे धान्य पूर्णपणे जळून खाक झाले.आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.