Published On : Sat, Jan 27th, 2018

स्वच्छता ॲम्बेसेडर आणि स्वच्छ सर्वेक्षणात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गणराज्यदिनी सत्कार


नागपूर: स्वच्छ सर्वेक्षणासंदर्भात जनजागृती करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने नेमलेल्या स्वच्छता ॲम्बेसेडरचा आणि स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत झोननिहाय विविध गटात प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्यांचा सत्कार गणराज्य दिनानिमित्त मनपा मुख्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आला.

स्वच्छता ॲम्बेसेडर डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. अमित समर्थ, कवी मधुप पांडेय, पर्यावरण क्षेत्रात कार्य करणारे कौस्तभ चॅटजी आणि आरजे निकेता साने हे आपआपल्या क्षेत्रात स्वच्छताविषयक जनजागृती करीत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि तुळशीचे रोपटे देऊन महापौर नंदा जिचकार यांनी केला.

स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत विविध गटातील झोननिहाय व्यक्ती, संस्थांनी स्वच्छतेसंदर्भात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. हॉटेल्स गटात झोन क्र. १ ते १० अंतर्गत अनुक्रमे हॉटेल एअरपोर्ट सेंटरपॉईंट, हॉटेल हेरिटेज, आर. आर. बार ॲण्ड रेस्टॉरंट, हॉटेल द्वारकामाई, युफोरिया रेस्टॉरंट, हॉटेल अल-झम-झम, डे टू डे रेस्टॉरंट, काश्मीर रेस्टारंट, अशोका रेस्टॉरंट, शाळा गटात सोमलवार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सी.पी. ॲण्ड बेरार हायस्कूल, साऊथ प्वॉईंट स्कूल, नारायण विद्यालयम, स्वराज पब्लिक स्कूल, जे.एन. टाटा पारसी गर्ल्स हायस्कूल, झुलेका कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, श्रेयस विद्यालय, एसएससी गर्ल्स हायस्कूल, पेन्शन नगर उर्दू शाळा, रुग्णालये गटात ऑरेंज सिटी हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटर, आयकॉन हॉस्पीटल, आदीशक्ती हॉस्पीटल, पूर्वी हॉस्पीटल, वंजारी हॉस्पीटल, न्यू ईरा हॉस्पीटल, खिदमत हॉस्पीटल, श्री रामदेवबाबा रुखमिणीदेवी मेमोरियल मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटर, हर्षल मॅटरनिटी होम, ॲलेक्सीस मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल प्रा.लि., गृहनिर्माण संस्था गटात अमल एन्कल्युसीव, म्हाडा कॉलनी, आनंद मेलिनियम टॉवर, टाटा कॅपिटल हाईटस्‌, एन.आय,टी. कॉम्प्लेक्स, भोसले विहार कॉलनी, मेहंदीबाग कॉलनी, व्यंकटेश कॉलनी, निलगिरी अपार्टमेंट, कुकरेजा नगर तर व्यापारी संघटना गटात गोकुलपेठ व्यापारी संघटना, नॅशनल गांधी मार्केट असोशिएशन, महात्मा फुले मार्केट, गांधी गेट व्यापारी सेवा मंडल, दि नागपूर जनरल मर्चंट असोशिएशन, कमाल बाजार, जरीपटका दुकानदार संघ यांच्या प्रतिनिधींचा महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, तुळशीचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, आयुक्त अश्विन मुदगल, धरमपेठ झोन सभापती रूपा राय, नगरसेवक प्रमोद कौरती, जितेंद्र घोडेस्वार उपस्थित होते.


नागपूर शहर स्वच्छ ठेवण्यात मोलाची भूमिका निभावणाऱ्या विविध गटातील सत्कारमूर्तींचे महापौर नंदा जिचकार यांनी कौतुक केले. नागपूर शहरातील प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून शहर स्वच्छ ठेवण्यात योगदान द्यावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे यांनी केले.