Published On : Mon, Jun 17th, 2019

सिक्कीम राज्यातुन पुरस्कार प्राप्त विजय हटवार याचा सत्कार

Advertisement

कन्हान : – सिक्कीम राज्या व्दारे पुरस्कार प्राप्त खाद्य निगम सदस्य मा. विजय हटवार याचा कन्हान शहरवासी या नागरी सत्कार करण्यात आला.

रामटेक विधानसभा क्षेत्र भाजपा पदाधिकारी व सरकार खाद्य निगम सदस्य मा.विजय हटवार यांचे नुकतेच सिक्कीम सरकार व्दारे खाद्य निगम सदस्यचां उत्कृष्ट कार्याबाबत गुणगौरव करून पारितोषिक देवुन सत्कार करण्यात आला. सिक्कीम राज्यातुन पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर प्रथमचं कन्हान शहरात आगमण व सादिच्छा भेटीचे औचित्य साधुन मा.विजय हटवार याचा कन्हान शहरवासीया तर्फे नागरी सत्कार करण्यात आला.

Advertisement

तसेच कन्हान पिपरी येथील इयत्ता १० वी व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थी कु.झोया जाकीर कुरैशी, कु अनुष्का गणेश रामापूरे, पुष्कर राजेंन्द्र मेश्राम, अफरिना रहिम शेख यांचा मा विजय हटवार च्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार व अभिनंदन करण्यात आला. भविष्यात ह्या विद्यार्थ्याच्या भविष्याकरीता कुठलाही प्रसंगी उच्च शिक्षणक्षेत्रात शिकण्याकरीता निस्वार्थ मदत करू व उज्वल भविष्या करीता ईश्वरीय प्रार्थना केली.

असे भावनिक प्रतिपादन या वेळेस श्री.विजय हटवार केले.याप्रसंगी सौ.सुषमा चोपकर नगरसेविका, प्रशांत बाजीराव मसार सामाजिक कार्यकर्ता, कोठीराम चकोले पहलवान,शेख अकरम कुरेशी, महेंन्द्र भुरे, संजय चोपकर, अमोल साकोरे, कुंदन रामगुंडे, सचिन गजभिए, गणेश रामापुरे, अल्लु भाईजान आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisementss
Advertisement
Advertisement
Advertisement