Published On : Thu, Feb 10th, 2022
By Nagpur Today Nagpur News

‘दोष धातू मल विज्ञान’ राज्यपालांच्या हस्ते प्रकाशित

Advertisement

प्रसिद्ध स्त्रीरोग तसेच आयुर्वेद तज्ज्ञ डॉ हणमंतराव पालेप यांनी लिहिलेले ‘दोष धातू मल विज्ञान’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी (दि.९) राजभवन येथे संपन्न झाले.

कार्यक्रमाला नागालॅन्डचे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य व पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ उपस्थित होते.

भारतीय आरोग्य चिकित्सा पद्धती तसेच तत्वज्ञानात प्रत्येक गोष्टीचा समग्र आणि साकल्याने विचार केला आहे. देशातील ऋषीमुनींनी गहन संशोधनानंतर काढलेले सार आयुर्वेदाच्या माध्यमातून उपलब्ध आहे. आयुर्वेद सर्व दृष्टीने सुरक्षित चिकित्सा पद्धती आहे. आज ऍलोपॅथीला पर्याय नाही. मात्र रुग्णाला सेवा देताना ऍलोपॅथीसोबत आयुर्वेदाचा देखील विचार झाला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी बोलताना केले.

आयुर्वेद जीवन पद्धतीमध्ये आहाराला देखील विशेष महत्व आहे, असे सांगून ‘रीत भूक, मित भूक आणि हित भूक’ हा समन्वय पाळल्यास अनेक आजारांपासून रक्षण करता येते असे राज्यपालांनी सांगितले.

Advertisement

आयुर्वेद हे एक परिपूर्ण विज्ञान आहे. परंतु आयुर्वेद समजण्याकरिता संस्कृत भाषा व भारतीय तत्वज्ञान समजणे गरजेचे आहे असे आपल्या लक्षात आले. त्यामुळे आधुनिक वैद्यक शास्त्रामध्ये आयुर्वेदाबद्दल अनेक गैरसमज आहेत. ‘दोष धातू मल विज्ञान’ या पुस्तकाच्या माध्यमातून आयुर्वेद व आधुनिक चिकित्सा पद्धतीमधील दरी कमी करण्याचा आपण प्रयत्न केला असल्याचे लेखक डॉ पालेप यांनी सांगितले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.