Published On : Thu, Jun 12th, 2025
By Nagpur Today Nagpur News

अहमदाबादमध्ये भीषण विमान अपघात; माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी विमानात असल्याची माहिती

Advertisement

अहमदाबाद – अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर गुरुवारी दुपारी एक मोठी दुर्घटना घडली. लंडनकडे जाणारे एअर इंडियाचे प्रवासी विमान उड्डाणादरम्यान अचानक कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हेही प्रवास करत होते, अशी माहिती समोर आली असून, त्यामुळे या घटनेचे गांभीर्य आणखीनच वाढले आहे.

सुरुवातीच्या माहितीनुसार, विमान उड्डाण घेण्याच्या क्षणीच तांत्रिक बिघाडाचा सामना करत होते. इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे ते थेट धावपट्टीजवळील परिसरात कोसळले. या भीषण अपघातात २४२ प्रवासी विमानात होते.

Gold Rate
23 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,57,800/-
Gold 22 KT ₹ 1,46,800/-
Silver/Kg ₹ 3,29,800 /-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

घटनेनंतर तातडीने बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. अनेक प्रवासी जखमी झाले असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताच्या ठिकाणी विमानतळ प्रशासन, सुरक्षा यंत्रणा आणि तपास पथक पोहोचले असून, दुर्घटनेच्या नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे. यापार्श्वभूमीवर विमानतळावरील इतर उड्डाणांवरही परिणाम झाला आहे. काही विमानांचे मार्ग बदलण्यात आले आहेत, तर काही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

दरम्यान, विजय रूपाणी यांची स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारी पातळीवरून चौकशीचे आदेश देण्यात आले असून, संपूर्ण घटनेचा सखोल तपास सुरू आहे.

या अपघातामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले असून, अधिकृत माहितीची प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement