Published On : Mon, Dec 4th, 2017

नागपूरनजिक अ‍ॅम्ब्युलन्स व ट्रकदरम्यान भीषण अपघात; चार ठार, पाच जखमी


नागपूर: अकोल्याहून नागपूरच्या मेयो रुग्णालयात येत असलेल्या एका अ‍ॅम्ब्युलन्सला नागपूर शहराच्या लगत असलेल्या आठवा मैल या औद्योगिक वसाहतीच्या क्षेत्रात सोमवारी पहाटे चारच्या सुमारास भीषण अपघात झाला.

ही अ‍ॅम्ब्युलन्स व ट्रकच्या झालेल्या धडकेत चार जण जागीच ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात ठार झालेल्यांचे मृतदेह मेयो रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत.

यासंबंधीचे सविस्तर वृत्त लवकरच देत आहोत.