
नागपूर : राज्यातील सर्व वाहनांना फास्टटॅग अनिवार्य करण्यात आला आहे. येत्या एक एप्रिलपासून हा नवा नियम लागू होणार आहे.
Featured Products
मुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.या निर्णयामुळे वाहतूक कोंडी टळून इंधनाची आणि वेळेची देखील बचत होणार आहे.
फास्ट टॅग कार्यरत नसेल तर वाहन धारकाला पथकर शुल्काच्या दुप्पट शुल्क भरावे लागेल. त्याचप्रमाणे रोख रक्कम स्मार्ट कार्ड क्रेडिट डेबिट कार्ड किंवा कोड किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे पथकर शुल्क भरा.
यचे असेल तरी देखील दुप्पट पथकर शुल्क भरावे लागेल एमएसआरडीसीच्या अखत्यारीत 50 टोलनाके असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यात 23 टोल नाके आहेत. या नाक्यांवर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल,अशी माहिती ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
Advertisement








