Published On : Tue, Aug 9th, 2022
By Nagpur Today Nagpur News

‘फास्ट फूड’ आज से थोडा कम

Advertisement

शहरातील मनुष्याचे जीवन हे फार धकाधकीचे व तणावपूर्ण झालेले आहे. स्वतःच्या आरोग्याकडे किंवा स्वतःच्या आहारकडे त्याचे लक्ष राहीले नाही. माणसाला जेवणासाठी सुद्धा वेळ राहीला नाही. आयुष्य फार फास्ट झाल्यामुळे,फास्ट फूड खाण्याकडे मनुष्याचा कल वाढलेला आहे. जेवणाच्या सवयी मध्ये फार मोठा प्रमाणात बदल झालेला आहे. फास्टफूड अन्न पदार्थ दिसायला आकर्षक रंग असलेले, खूप गोड, खारट असतात तसेच खायला पन चविष्ट लागतात. परंतु या अन्न पदार्थामध्ये फार मोठ्या प्रमाणात तेल (Fats), साखर आणि मीठाचा उपयोग केला जातो. या अन्नपदाथाचे सेवन नियमित व जास्त प्रमाणात केल्यास त्यापासून आरोग्याला लाभदायी असे परिणाम न मिळता आजारांना आमंत्रण दिले जाते.

मनुष्याच्या जेवणाच्या सवयी मध्ये अन्नपदाथांचे जागतिकीकरण, बदलती संस्कृती आदींमुळे फार मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे आपल्याला दिसून येतो. कोणत्याही कार्यक्रमात जसे लग्न समारंभ,वाढहद दिवस, यात्रा, फूडफे स्टॉल आदी ठिकाणी जेवणाचे वेगवेगळे स्टॉल लावलेले असतात. अशा भारतीय जेवणाच्या स्टॉलवर नेहमीचे अन्न पदार्थ जसे भाजी, पोळी, भात यांच्या स्टॉलवर फार कमी गर्दी दिसून येते,परंतु जंकफूड, फास्टफूड, समोसा, बटाटा वडा, बगणरकधी अन्नपदाथाच्या स्टॉलवर बऱ्याच प्रमाणात मोठी गर्दी दिसून येते. काही वर्षपूवी आपण सिनेमा बघायला जात होतो. तेव्हा फार कमी प्रेक्षक पॉपकॉर्न किवा कोर्ल्डींग घेत होते. परंतु आज जर आपण मध्यांतरानंतर थोडं देऊ नजर ऐकलंतर खाण्याचा इतक्या मोठ्या प्रमाणात आवाज व सुगंध येतो की आपल्याला वाटतं बरेचसे प्रेक्षक फक्त खाण्यासाठीच आले होते काय ? म्हणजे आपण हॉलमध्ये दोन अडीच तास सुद्धा अन्नपदार्थ सेवन केल्याशिवाय राहू शकत नाही.

Gold Rate
20 May 2025
Gold 24 KT 93,400/-
Gold 22 KT 86,900/-
Silver/Kg 95,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जंकफूड खाल्ल्यामुळे शरीराला पोर्क अन्न घटक द्रव्ये मिळत नाहीत त्यामुळे वेगवेगळे आजार होत आहेत, जसे मधुमेह, बीपी या आजारमुळे मरणाऱ्या लोकांची टक्केवारीचे प्रमाण गेल्याकाही वर्षात प्रचंड वाढले आहे. एका दशकात, मधुमेहाने मरणाऱ्या लोकांची संख्या सुमारे 50 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. लठ्ठपणा हा त्यापैकी एक महत्वाचा भाग बनला आहे. बैठी जीवनशैलीही सर्वात मोठी आरोग्य समस्या बनली आहे. भारतासारख्या देशांमध्ये अत्यंत चिंतेची बाब आहे

आकडेवारी दर्शवते की, भारतीयांच्या जेवणात साखर, मीठ आणि तेलचा वाढता वापर ही गंभीरतेची बाब आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतात मृत्यू पावलेल्या लोकसंख्येच्या एकूण मृत्यूंपैकी 61 टक्के मृत्यू असंर्गजन्यरोगांमुळे(NCD-Non Communicable Diesese) होतात जसे हृदय रोग ,मधुमेह,स्थूलता इत्यादी. सन 2015 मध्ये इंडियन जर्नल ऑफ कम्युनिटीमेडिसीन मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, भारतातील साखरेचा दरडोई वापर प्रतिदिन २२ ग्रॅम असल्याचे सन 2000 मध्ये दिसूनआले, जे सन 2010 मध्ये 55.3 ग्रॅमपर्यंत वाढले. त्याचप्रमाणे, मीठाचा दरडोई वापर दररोज 12 ग्रॅमपर्यन्त वाढला आहे. खादय तेलाचे, दरडोई वापर सन 2000 मध्ये दररोज 21.2 ग्रॅम होते, जे सन 2010 मध्ये 54 ग्रॅम प्रतिदिन झाले आहे. या सर्वांचा थेट परिणाम हृदयरोग, लठ्ठपणा आणि मधुमेह्याचे प्रमाण वाढण्यात होत आहे. भारतीयांमध्ये साखर, मीठ आणि तेलाचे सेवन वाढण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे प्रक्रीया केलेले अन्न पदार्थाचे सेवन.

भारताचा अन्न प्रक्रिया उद्योग हा जगातील पाचव्या क्रमांकाचा उद्योग आहे. सरकारनेही या उद्योगाला चालना देण्यासाठी प्रोत्साहन दिलेले आहे. उद्योगांना कर सवलत, त्यांच्या निर्यातीत सवलत आयातीत सवलत दिल्यामुळे,प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ सहज उपलब्ध झाल्याने व त्यांचेसेवन वाढल्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की भारतातील लोकांमध्ये हृदयविकार, लठ्ठपणा आणि मधुमेह वाढत आहे.

त्यामुळे फूडसेफ्टी & स्टँडर्ड अथॉरीटी ऑफ इंडिया (FSSAI ) ने ‘Eat Right चळवळ राबविण्याचे ठरविले आहे. जेणेकरून खानपानचे सवयी बदलेल अशी आशा आहे. या मोहीमेचे उद्दिष्ट पॅकबंद खाद्यपदार्थांमध्ये वापरण्यात येणारी साखर, मीठ आणि तेलाचे प्रमाण 30 टक्क्यांनी कमी करण्याचे आहे. पुढील तीन वर्ष अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरनाचा, उद्देश अन्न पदार्थामधील जास्त प्रमाणात असलेली साखर, मीठ आणि तेलाचा वापर कमी करणे व त्यांचा सेवन केल्यामुळे होणाऱ्या हानिकारक परिणामांबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आहे.

फोर्टटस सेंटर फॉर डायबिटीज, ओबेसिटी अँड कोलेस्रॉल (C-DOC) चे डॉ. अनूप मिश्रा, म्हणतात: जर आपल्या अन्नात साखर, मीठ आणि तेलाचे प्रमाण कमी केले तर निम्म्याहून अधिक आरोग्याच्या समस्या दूर होतील.

शासनाचा हा स्तुत्य उपक्रम लोकांना खाण्याच्या सवयी सुधारण्याचे आवाहन करतो. प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ (HFSS) मध्ये सामान्यतः तेल, साखर आणि मीठाची उच्च पातळी असते.अश्या अन्न पदाथांचे नियमित आणि जास्त सेवन केल्याने लठ्ठपणा येतो. मधुमेह,उच्च रक्तदाब,आजार होतात. म्हणून, आपल्या रोजच्या आहारात HFSS-High Fat,Sugar & Salt या पदाथांचा वापर कमी करणे अत्यंत आवश्यक आहे.

आपल्या सर्वांना माहित आहे की खाण्याच्या सवयी (आहाराची वर्तणूक) एका रात्रीत बदलू शकत नाही आणि अयोग्य आहाराचे सवयी टाळण्यासाठी बरीच जागरूक पावले उचलली पाहीजेत.आहारातील एक छोटासा योग्य बदल देखील त्यांच्या आरोग्यामध्ये लक्षणीय सकारात्मक बदल घडवून आणू शकतो, हा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण करण्यासाठी, अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरनाने राजकुमार राव अभिनीत “आज से थोडा कम” ही देशव्यापी सोशल मिडिया मोहीम सुरू केली आहे. आहाराशी संबंधित असंसर्गजन्य आजार जसे की मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयविकार इ. कमी करण्यासाठी आहारात बदल करणे हा या मोहीमेचा उद्देश असून ग्राहकांना त्यांचे मीठ, साखर आणि तेलाचा वापर हळूहळू कमी करण्यास प्रोत्साहीत करते.

यापुढे निरोगी आनंददायी जीवनासाठी “आजसे थोडा कम”…….

Advertisement
Advertisement
Advertisement