Published On : Tue, Feb 6th, 2018

महिला उद्योजिका मेळाव्यात स्त्री शक्तीचा जागर

Advertisement


नागपूर: गणेश वंदना, अलताफ बॅण्ड, फॅशन शो ने कार्यक्रमात रंगत आणली. निमित्त होते ते नागपूर महानगरपालिका, महिला व बालकल्याण समिती, समाजकल्याण विभागातर्फे आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याचे. रेशीमबाग मैदान येथे सुरू असलेल्या महिला उद्योजिका मेळाव्यात तिस-या दिवशी “जागर स्त्री शक्तीचा” युनिक कल्चरल सोशल फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमला प्रमुख अतिथी म्हणून क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, दिल्ली भाजपाच्या सीमा निगम, सरिता नांदुरकर, माजी महिला व बालकल्याण समिती सभापती रश्मी फडणवीस, कल्पना बाजारे, हर्षला भोसले, महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, समिती सदस्या दिव्या धुरडे, वंदना भगत, उपायुक्त डॉ.रंजना लाडे यावेळी मंचावर उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे सत्कार महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरूवात झाली. देवा श्री गणेशा या गाण्यावर नृत्य सादर केले. अलताफ बॅंड ने गणेश स्तवन, हिंदी, मराठी गाणी सादर केली. बॅंड, गिटार, बासरी यांच्या तालावर गणनायका, लग जा गले, छुकर मेरे मन को यांच्यासह अनेक चित्रपट गीतांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. अप्सरा आली या लावणीच्या ठेक्यावर फॅशन शो व नृत्य सादर करण्यात आले.

Gold Rate
19 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,32,000/-
Gold 22 KT ₹ 1,22,800 /-
Silver/Kg ₹ 1,98,700/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

उद्या बुधवार (ता.७) कार्यक्रमाच्या मालिकेत प्रसन्न जोशी व सहायक कलाकार यांचा भजनसंध्या व गजल कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे यांनी केले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement