Published On : Tue, Jun 27th, 2017

महाजेम्स फ्लाय अँश क्लस्टरमध्ये पारंपारिक कुंभार व्यावसायिकांना प्राध्यान्य

Advertisement

Shyam Wardhane
नागपूर :
महानिर्मितीच्या खापरखेडा औष्णिक वीज केंद्र परिसरातील वारेगाव राख बंधाऱ्यालगत असलेल्या जागेत नवीन तंत्रज्ञान व पर्यावरणरक्षण या दोन्हीचा अवलंब करून वीट उत्पादनासाठी आवश्यक जमीन, पाणी, वीज,राख तसेच इतर प्राथमिक सोयी-सुविधा सवलतीच्या दरात पुरवण्यात येणार असल्याचे महाजेम्सचे व्यवस्थापकीय संचालक श्याम वर्धने यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र राज्याच्या फ्लाय अँश धोरणानुसार, महानिर्मितीच्या औष्णिक वीज केंद्राजवळ प्रस्तावित फ्लाय अँश क्लस्टरमध्ये विस्थापित पारंपारिक कुंभार व्यावसायिकांना प्राधान्याने सामावून घेण्याबाबत ऊर्जामंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आवाहन केले होते. त्या अनुषंगाने,नुकतेच महाजेम्सचे व्यवस्थापकीय संचालक श्याम वर्धने यांच्या अध्यक्षतेखाली कुंभार व्यावसायिक प्रतीनिधींसोबत महाजेम्सच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. यानिमित्ताने, महाजेम्सचे अधिकारी व कुंभार व्यावसायिक प्रतिनिधी यांनी वारेगाव येथील प्रस्तावित अँश क्लस्टरच्या जागेची संयुक्त पाहणी केली. वीज केंद्रालगत जागा उपलब्ध होत असल्याने राख वाहतूक खर्चात बचत, नवीन तंत्रज्ञान, पर्यावरण संरक्षण व पर्यायाने वीट उत्पादन कमी दरात होण्यास हातभार लागेल असा विश्वास श्याम वर्धने यांनी व्यक्त केला.

या बैठकीला कुंभार समाज सेवा पंचकमिटीचे अध्यक्ष राजीव खरे, विदर्भ कुंभार समाजाचे अध्यक्ष सुरेश हारोडे, महाराष्ट्र कुंभार महासंघाचे अध्यक्ष गोपाल बनकर व ईतर सदस्य तसेच महाजेम्सच्यावतीने सुखदेव सोनकुसरे, प्रशांत देशपांडे, उपेंद्र पाटील,पंकज धारस्कर प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
14 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,26,000 /-
Gold 22 KT ₹ 1,17,200 /-
Silver/Kg ₹ 1,62,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement