Published On : Wed, Aug 1st, 2018

2004 मध्ये मुख्यमंत्री आणि नितीन गडकरींच्या नावाने बनावट ट्रॅक्टर परवाना

Advertisement

जळगाव: आरटीओत पैसे दिल्यानंतर कोणतीही कागदपत्रे अगदी कमी वेळात कशी उपलब्ध होऊ शकतात याचा नमुना म्हणजे चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांच्या 2004 मध्ये ट्रॅक्टरचा परवाना तयार तयार करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आरटीओ कार्यालयातील कारभार आता लोकांच्या अंगवळणी पडला आहे. पण आता तर चक्क मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावानेच बनावट कागदपत्र तयार होऊ लागल्याने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दलाल कशा प्रकारे नियमांची पायमल्ली करतात हे या निमित्ताने पाहायला मिळाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर वाहन परवाना क्रमांक २२३३/२००४ हा तयार करण्यात आला आहे. या परवान्यावर मुख्यमंत्र्यांची बनावट सही तयार केली आहे. त्यांच्या निवासाचा पत्ता बजरंगपुरा, जामनेर हा दाखविला आहे. त्यांचे शिक्षण पदवीपर्यंत तर रक्तगट ए-पॉझिटीव्ह दर्शविलेला आहे. सुरुवातीच्या काळात आर.टी.ओ. कार्यालयामार्फत पुस्तक स्वरुपात वाहन चालविण्याच्या परवान्याचे वितरण करण्यात आले आहे. मात्र हा परवाना तयार करीत असताना नियमांची पायमल्ली होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.