Published On : Tue, Feb 17th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर मनपाच्या नावाने बनावट भरती जाहिरात व्हायरल; १०० पदांचा दावा खोटा, पोलिसांत तक्रार

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिका यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट भरती जाहिरात प्रसारित करून युवकांची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मनपा प्रशासनाने संबंधितांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली असून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीत नागपूर महानगरपालिकेत कंत्राटी तत्त्वावर १०० पदांची भरती केली जाणार असल्याचा दावा करण्यात आला होता. प्रत्येक झोनमध्ये १० ‘प्रिंटर ऑपरेटर’ आणि १० ‘डॉक्युमेंट स्कॅनर’ पदे भरण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. इच्छुकांनी संपर्क साधावा म्हणून दोन मोबाईल क्रमांकही जाहिरातीत देण्यात आले होते.

Gold Rate
July 20 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,400 /-
Gold 22 KT ₹ 1,32,100 /-
Silver/Kg ₹ 2,20,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मनपा प्रशासनाने मात्र ही जाहिरात पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. महानगरपालिकेची भरती प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक पद्धतीने राबवली जाते आणि कोणत्याही पदासंदर्भातील माहिती केवळ अधिकृत संकेतस्थळावरच प्रसिद्ध केली जाते, असे प्रशासनाने सांगितले. उमेदवारांनी कोणत्याही मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

हा प्रकार समोर येताच सामान्य प्रशासन विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त राजकुमार मेश्राम यांनी संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. बनावट जाहिरात प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Advertisement

दरम्यान, नागरिकांनी व उमेदवारांनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या अशा भ्रामक जाहिरातींवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही अधिकृत माहिती मिळवण्यासाठी मनपाच्या संकेतस्थळाचीच खात्री करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Advertisement
nagpur student protest delhi lathi charge

nagpur student protest delhi lathi charge

प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews  #CrimeNews  #LatestNews #news #Attack #newsupdate

प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #news #Attack...

चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews  #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery

चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery

लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews #newsupdate

लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews...

कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug #NDPS #Crime #latestnews #news

कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug...

नागपुर में अन्ना गैंग का आतंक! NagpurNews #AnnaGang #Theft #Crime  #CCTV #LatestNews #newsupdate

नागपुर में अन्ना गैंग का आतंक! NagpurNews #AnnaGang #Theft #Crime #CCTV #LatestNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges